Farmer Subsidy Update : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी अजूनही सुमारे अकरा लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (Farmer Subsidy Update)
शासनाने २० लाख ५९ हजार शेतकऱ्यांसाठी एकूण १ हजार ४८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी आतापर्यंत फक्त ९ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६७३ कोटी रुपये जमा झाले आहेत. (Farmer Subsidy Update)
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय मराठवाडा
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिके बाधित, हजारो जनावरे मृत्युमुखी, आणि शंभराहून अधिक नागरिकांचा बळी गेला. हजारो घरं, मालमत्ता आणि शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले.
राज्य शासनाने या नुकसानीसाठी १ हजार ४१८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, आतापर्यंत फक्त ४७ टक्के निधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील मदतीचा आढावा
जिल्हा | बाधित शेतकरी | मदत मिळालेले शेतकरी | दिलेले अनुदान (रु.) |
---|---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | १७१ | १२३ | २९ हजार |
हिंगोली | २,३८,५३० | ५५,१२१ | ३० कोटी २९ लाख |
नांदेड | ३,०८,४७१ | १,३७,४६१ | १०५ कोटी ९४ लाख |
बीड | ७,८१,८८१ | ४,०१,०४८ | ३०६ कोटी २२ लाख |
लातूर | १,१४,८७६ | ४,९९७ | २ कोटी ४२ लाख |
धाराशिव | ३,८०,५११ | २,२७,७८९ | १५६ कोटी ६८ लाख |
परभणी | २,३५,२२५ | ८४,३०२ | ७१ कोटी ४१ लाख |
एकूण | २०,५९,५९१ | ९,१०,७४९ | ६७३ कोटी ७५ लाख |
ई-केवायसीमुळे ४ लाख शेतकऱ्यांचे अनुदान अडकले
शासनाकडून मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र, आतापर्यंत ४ लाख ११ हजार ७१६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांचे सुमारे २६९ कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. विभागातील २५ टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अजून अपलोड होणे बाकी असल्याने प्रक्रिया मंदावली आहे.
दिवाळीचा सण जवळ आल्याने, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सायंकाळी ऑनलाइन बैठक घेऊन मदत वाटपाचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्याचे निर्देश दिले.
अनेक शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात मदत न आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. "पिकं गेली, कर्ज वाढलं आणि दिवाळी समोर उभी आहे... आता शासनाने तरी लवकर मदत द्यावी," अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Web Summary : Marathwada farmers await promised rain subsidies. Only 47% of funds disbursed, impacting Diwali celebrations. E-KYC delays affect many; officials expedite payments.
Web Summary : मराठवाड़ा के किसान बारिश सब्सिडी का इंतजार कर रहे हैं। केवल 47% धन वितरित किया गया, जिससे दिवाली उत्सव प्रभावित हुआ। ई-केवाईसी में देरी से कई प्रभावित; अधिकारियों ने भुगतान में तेजी लाई।