Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Subsidy Scam : शेतकऱ्याचे अनुदान गायब; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 16:48 IST

Farmer Subsidy Scam : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर मंजूर झालेले शासकीय अनुदान थेट दुसऱ्याच बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव तालुक्यात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर (Farmer Subsidy Scam)

Farmer Subsidy Scam : धाराशिव तालुक्यातील नितळी गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याचे शासकीय अनुदान परस्पर अन्य बँक खात्यात वर्ग करून हडप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (Farmer Subsidy Scam)

या प्रकरणी तलाठ्याच्या खासगी रायटरवर संशय व्यक्त केला जात असून, 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे.(Farmer Subsidy Scam)

चौकशी समितीचा अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत सादर होण्याची शक्यता असून, त्यानंतर दोषींवर कडक कारवाई होऊ शकते.

धाराशिव तालुक्यातील नितळी येथील शेतकरी पंडित टोंगळे यांची गावात वडिलोपार्जित सुमारे सहा हेक्टर शेती आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून त्यांच्या नावे मंजूर झालेले अनुदान प्रत्यक्षात मात्र त्यांना आजवर मिळालेले नाही. याबाबत शंका आल्याने टोंगळे यांनी माहिती अधिकार व बँक खात्याच्या तपशीलांची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली.(Farmer Subsidy Scam)

टोंगळे यांच्या नावे मंजूर झालेले अनुदान तलाठ्याच्या खासगी रायटरने परस्परपणे एका महिलेच्या, म्हणजेच आपल्या पत्नीच्या बँक खात्याशी जोडून त्या खात्यावर वर्ग केल्याचे निष्पन्न झाले आहे.(Farmer Subsidy Scam)

सन २०२५ मध्ये मंजूर झालेले २० हजार रुपये अनुदान २० नोव्हेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्रातील संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाले.

यापूर्वी २०२४ मधील २५ हजार ५०० रुपये अनुदानही याच खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकारानंतर शेतकरी पंडित टोंगळे यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. 'लोकमत'ने या प्रकरणावर प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने हालचालींना वेग आला.

तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून सखोल तपास सुरू केला आहे.

तक्रारदार शेतकरी पंडित टोंगळे यांच्या नावे २०१५ पासून आलेले सर्व शासकीय अनुदान व मदत कोणत्या बँक खात्यावर वर्ग झाली, याची सखोल चौकशी सुरू आहे. दोन-तीन दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल.- डॉ. मृणाल जाधव, तहसीलदार, धाराशिव

सध्या चौकशी अंतिम टप्प्यात असून, अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे.

या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शासकीय अनुदान वितरणातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे ही वाचा सविस्तर :शेतकऱ्याला बुटाने मारहाण; अखेर कृषी अधिकारी निलंबित वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Who swindled the farmer's subsidy? Investigation underway.

Web Summary : A probe has been launched into allegations of misappropriated farmer subsidies. The question arises: who benefited from funds intended for struggling agriculturalists? Authorities are investigating potential corruption and ensuring accountability.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती