Join us

Farmer Jugaad : नवा मार्ग, नवा जुगाड; सूर्यवंशी बंधूंनी दुचाकीवर केली आंतरमशागत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:24 IST

Farmer Jugaad : मजूर टंचाई, वाढता खर्च लक्षात घेऊन बैलजोडीच्या मागे धावण्याऐवजी नांदेडच्या सूर्यवंशी बंधूंनी हटके मार्ग शोधला. दुचाकीला औत बांधून कपाशी पिकात आंतरमशागत (Inter-Cultivation) केली आणि तब्बल ९०० रुपयांची बचत केली. या प्रयोगाचे गावभर कौतुक होतंय आणि तो इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरतोय. (Farmer Jugaad)

Farmer Jugaad : मजूर टंचाई, वाढता खर्च लक्षात घेऊन बैलजोडीच्या मागे धावण्याऐवजी नांदेडच्या सूर्यवंशी बंधूंनी हटके मार्ग शोधला. दुचाकीला औत बांधून कपाशी पिकात आंतरमशागत(Inter-Cultivation) केली आणि तब्बल ९०० रुपयांची बचत केली. (Farmer Jugaad)

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथील भावंडांनी बैलजोडी न मिळाल्याने दुचाकीलाच औत जोडून कापसात आंतरमशागत(Inter-Cultivation) केली.या प्रयोगाचे गावभर कौतुक होतंय आणि तो इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरतोय.(Farmer Jugaad)

अवघ्या एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकरची मशागत(Inter-Cultivation) झाली. त्यामुळे एका एकरमध्ये बैलजोडीच्या तुलनेत तब्बल नऊशे रुपयांची बचत झाली. या अनोख्या जुगाडाचे कौतुक होत आहे.(Farmer Jugaad)

उंद्री (प.दे) येथील गजानन सूर्यवंशी आणि श्रीनिवास सूर्यवंशी या दोघा भावांमध्ये दहा एकर शेती आहे. त्यात चार एकरवर कपाशी लावलेली आहे.(Farmer Jugaad)

कपाशी पिकात आंतरमशागतीसाठी बैलजोडी मालकाशी बोलणी केली. एका एकरमागे एक हजार याप्रमाणे दरही ठरविला होता; परंतु ठरलेल्या दिवशी तो बैलजोडी घेऊन आलाच नाही.(Farmer Jugaad)

अखेर दोन्ही भावांनी दुचाकीच्या पाठीमागे दोरीने औत बांधून आंतरमशागत करता येते का, याची चाचपणी केली आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला.(Farmer Jugaad)

अवघ्या दोन तासांतच केवळ एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकरची आंतरमशागत झाली. बैलजोडीने एक हजार रुपये मोजावे लागत होते, तिथे शंभर रुपयांत काम झाले. त्यामुळे सूर्यवंशी बंधूंच्या या प्रयोगशीलतेचे कौतुक होत आहे.(Farmer Jugaad)

वजनाने हलके औत बनविण्याची गरज

शेतीकामासाठी बैलजोडी किंवा मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे दुचाकीचा आंतरमशागतीसाठी वापर करण्याची कल्पना सुचली; परंतु दुचाकीला जोडण्यासाठी औत वजनाने हलका असल्यास आणखी फायदा होईल. - गजानन सूर्यवंशी, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Poison-free Farming : कमी खर्च, जास्त उत्पादन; चेलक्यातील शेतकऱ्यांचा विषमुक्त प्रयोग यशस्वी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीलागवड, मशागतकापूसनांदेड