Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer ID : डिजिटल शेतकऱ्यांची नोंद; 'फार्मर आयडी'मुळे योजनांचा थेट लाभ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:40 IST

Farmer ID : शासकीय कृषी योजना, अनुदान आणि कर्जसुविधांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढत डिजिटल कृषी व्यवस्थेकडे पाऊल टाकले आहे. (Farmer ID)

Farmer ID : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान आणि उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला असून, हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४७ हजार २१० शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. (Farmer ID)

प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत झाले आहेत.(Farmer ID)

देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ॲग्रिस्टॅक (AgriStack) ही योजना राबविण्यात येत आहे. (Farmer ID)

या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीनधारणा, पीक पद्धती, हंगामी नोंदी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एका एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर संग्रहित केली जात आहे. 

ॲग्रिस्टॅकअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो.

हा फार्मर आयडी भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या पीक कर्ज, पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, बियाणे व खत अनुदान, कृषी अवजारे तसेच इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फार्मर आयडी नोंदणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

तालुकानिहाय नोंदणीची स्थिती

हिंगोली तालुक्यात ४५,७४३, सेनगाव ५३,६०८, वसमत ५६,८०५, औंढा नागनाथ ४१,६१२, तर कळमनुरी तालुक्यात ४९,४४२ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

काय आहेत फार्मर आयडीचे फायदे?

* फार्मर आयडीमुळे पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा व विविध सबसिडीची रक्कम थेट बँक खात्यात विनाविलंब जमा होणार आहे. 

* बँकांना शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याने कर्ज प्रक्रियेत कागदपत्रांचा त्रास कमी होईल. 

* तसेच जमीन व पीक नोंदींच्या आधारे शेतकऱ्यांना पीक संरक्षण व व्यवस्थापनाबाबत अचूक सल्ले मिळू शकणार आहेत.

अजूनही नोंदणी अपूर्ण

जिल्ह्यात एकूण ३ लाख ६३ हजार ९९० शेतकरी खातेदार असून, त्यापैकी सुमारे ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. 

आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये पीएम किसान योजनेचे १ लाख ८२ हजार २९१ लाभार्थी समाविष्ट आहेत.

प्रशासनाकडून उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : E-Peek Pahani : ई-पीक पाहणी का आहे अत्यंत महत्त्वाची? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer ID: Digital Record for Farmers; Direct Benefit of Schemes

Web Summary : Farmer ID is now mandatory for agricultural schemes. Hingoli district has registered 2.47 lakh farmers. This unique ID facilitates direct benefits like PM Kisan, crop insurance, and subsidies, streamlining loan processes. Farmers are urged to register to avoid losing benefits.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती