Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer DBT Scheme : सरकारचा मास्टरस्ट्रोक! केशरी रेशनधारक शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात पैसे आले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:31 IST

Farmer DBT Scheme : शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी तब्बल १२.१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, जवळपास २ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. धान्याऐवजी रोख मदत देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून, ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात दिसणार आहे. (Farmer DBT Scheme)

Farmer DBT Scheme : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांसाठी शासनाने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.(Farmer DBT Scheme)

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत समावेश न झालेल्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT) योजनेसाठी तब्बल १२ कोटी १५ लाख ६० हजार ९६२ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(Farmer DBT Scheme)

पुरवठा विभागाने या निधीस मान्यता दिली असून, जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ६० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना आता तातडीचा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

प्रति लाभार्थी १७० रुपयांची मदत

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख स्वरूपात मदत दिली जाते. सुरुवातीला जानेवारी २०२३ पासून प्रति लाभार्थी दरमहा १५० रुपये देण्यात येत होते. 

मात्र, २० जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करून दरमहा १७० रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळत आहे.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या

बुलढाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ५४,०७३ केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांची नोंद आहे. या कुटुंबांमधील एकूण लाभार्थ्यांची संख्या १,९७,०६० इतकी आहे. 

या सर्वांना मिळून मंजूर निधी वितरित करण्यात येणार असून, निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू केली जाणार आहे.

'धान्य बंद, पैसे सुरू' धोरण

पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना भारतीय अन्न महामंडळामार्फत दोन रुपये किलो तांदूळ आणि तीन रुपये किलो गहू या दरात धान्य दिले जात होते. मात्र, हा पुरवठा बंद झाल्यानंतर शासनाने धोरणात बदल करत धान्याऐवजी थेट रोख मदत देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार, आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार खर्च करण्याची मुभा मिळाली आहे.

विलंबामुळे नाराजी, आता दिलासा

मागील आर्थिक वर्षात या योजनेचा निधी वेळेवर न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यंदा निधी मंजूर झाल्याने आणि लवकरच खात्यात पैसे जमा होणार असल्याने शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धान्याऐवजी रोख मदतीचा हा निर्णय आणि मंजूर निधीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farm Dispute Resolved :'खाकी'ची कमाल; शेतात जाऊन पोलिसांनी घडवला समझोता वाचा सविस्तर

अधिक वाचा : सावकारांचा सापळा घट्ट; २.३४ लाख शेतकरी कर्जात बुडाले वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer DBT Scheme: Funds Released for Maharashtra's distressed farmers.

Web Summary : The Maharashtra government has approved ₹12.15 crore for the Farmer DBT scheme in Buldhana, benefiting 1.97 lakh farmers with direct cash transfers of ₹170 per month, replacing subsidized grain distribution. This provides crucial financial relief to families in the region.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती