Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fake Soybean Seeds Compensation : पेरलं पण उगवलंच नाही; शेतकऱ्याला न्याय, कंपनीला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:53 IST

Fake Soybean Seeds Compensation : नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बोगस बियाण्यामुळे मोठा फटका बसला; मात्र त्याने हार न मानता कायदेशीर लढा दिला आणि अखेर न्याय मिळवला. पेरणी करूनही बियाणे उगवले नाहीत, या प्रकरणात ग्राहक आयोगाने कंपनी व विक्रेत्याला दोषी ठरवत शेतकऱ्याला व्याजासह ३४ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे बोगस बियाणे विक्रेत्यांवर मोठा धक्का बसला आहे.(Fake Soybean Seeds Compensation)

नांदेड : हवामान खात्याचा अंदाज पाहून मोठ्या आशेने पेरणी केली. परंतु बियाणेच बोगस निघाल्याने डोळ्यात पाणी आलेल्या शेतकऱ्याला अखेर न्याय मिळाला.(Fake Soybean Seeds Compensation)

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 'ॲसन जेनेटिक्स' कंपनी आणि स्थानिक विक्रेत्याला सेवा दोषी धरत शेतकऱ्याला व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.(Fake Soybean Seeds Compensation)

नंदकिशोर भालकी येथील शिवाजीराव धाडवे यांनी २०२० च्या खरीप हंगामात 'महेंद्र सीइस'कडून सोयाबीनच्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या. 

१२ जून रोजी पेरणी झाली. ३४ हजार रुपये व्याजासह देण्याचे आयोगाचे आदेश त्यानंतर पाऊसही चांगला झाला. परंतु, शेतात काही अंकुरच फुटले नाही आणि बियाणे उगवलेच नसल्याचे पाहून धाडवे यांनी तालुका कृषी समितीकडे धाव घेतली. 

समितीने शेतात जाऊन पंचनामा केला असता बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. अॅड. गोपाळ भोसले यांच्यामार्फत धाडवे यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. कंपनीने तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेतला. 

आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील व सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी कृषी समितीचा अहवाल ग्राह्य धरला. 'शेतकऱ्याचे नुकसान हे केवळ आर्थिक नसून ते छळवणूक आहे', असे ताशेरे ओढले. 

कायदेशीर लढा दिल्यास न्याय मिळतो या निकालामुळे बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. 

केवळ तक्रार करून न थांबता कायदेशीर लढा दिल्यास न्याय मिळतो, हे या निकालाने सिद्ध केले आहे. शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना पक्की पावती, लॉट नंबर आणि रिकामे पाकीट किमान पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. 

जेणेकरून फसवणूक झाल्यास न्यायालयात भक्कम पुरावा सादर करता येईल, असे ग्राहक आयोगाने सांगितले.

हे ही वाचा सविस्तर :  fake seeds alert : खरीपपूर्वी ॲक्शन मोड; बोगस बियाण्यांविरोधात टोल फ्री नंबर सुरू

अधिक वाचा : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer Wins Fake Soybean Seed Case; Company Ordered to Pay!

Web Summary : Nanded farmer wins compensation after planting fake soybean seeds. Consumer forum penalizes company for defective seeds and orders compensation with interest. Legal battle proves crucial, warning fraudulent seed companies. Farmers advised to keep purchase records for evidence.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती