Join us

Fake Fertilizer : लिंकिंगचा गैरप्रकार उघड; जालन्यात कृषी विभागाची मोठी कारवाई वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:06 IST

Fake Fertilizer : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील पाच कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत झाडाझडती केली. (Fake Fertilizer)

Fake Fertilizer : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील पाच कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक कारवाई करत झाडाझडती केली. (Fake Fertilizer)

या तपासणीत त्रुटी आढळून आल्यामुळे दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ७ दिवसांत खुलासा न दिल्यास परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. (Fake Fertilizer)

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे स्थित पाच कृषी सेवा केंद्रांवर बुधवारी (२३ जुलै) रोजी कृषी विभागाच्या पथकाने अचानक झाडाझडती केली.  (Fake Fertilizer)

या तपासणीत सर्वच सेवा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत खुलासा सादर न केल्यास परवान्याबाबत कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत तालुका गुणनियंत्रण कृषी अधिकारी गणेश वाघ यांनी दिले आहेत. (Fake Fertilizer)

शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई

घुंगर्डे हादगाव येथील शेतकरी कृष्णा शिंदे यांनी कृषी सेवा केंद्रांच्या कार्यप्रणालीविरोधात तक्रार सादर केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका गुणनियंत्रण कृषी अधिकारी गणेश वाघ, सहायक कृषी अधिकारी यशवंत बिराजदार आणि योगेश तहकीक यांच्या पथकाने प्रत्यक्ष सेवा केंद्रांवर जाऊन सखोल तपासणी केली.

कारवाईत आढळलेले मुद्दे

एक सेवा केंद्र बंद स्थितीत होते.

उर्वरित केंद्रांमध्ये साठा नोंदीतील गोंधळ, विक्री/खरेदी रजिस्टरमध्ये विसंगती आढळून आली.

खत वितरणात लिंकिंगचा प्रकार, म्हणजे एक खत घ्यायचे असल्यास दुसरे खत घेण्याची अट घालणे  असा प्रकारही निदर्शनास आला.

दुकानदारांना दिल्या नोटिसा

तपासणीत त्रुटी आढळल्याने पाचही दुकानदारांना लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

यानंतरही समाधानकारक खुलासा न दिल्यास परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शिफारस करण्यात येईल, असे अधिकारी वाघ यांनी स्पष्ट केले.

आधीच इतर केंद्रांविरोधात प्रस्ताव

याआधी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील तीन सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. या केंद्रांविरोधातील प्रस्ताव आधीच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ही घुंगर्डे हादगाव येथील कारवाई त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचा सन्मान

लिंकिंग खतांची सक्ती करणे चुकीचे असून, शेतकऱ्यांना त्यांच्याच मागणीनुसार हवी ती खते उपलब्ध झाली पाहिजेत. कोणतीही अट घालू नये, असे स्पष्ट निर्देश कृषी सेवा केंद्रांना देण्यात आले आहेत, अशी ठाम भूमिका गणेश वाघ (तालुका गुणनियंत्रण कृषी अधिकारी) यांनी मांडली आहे.

पुढील पावले महत्त्वाची

घुंगर्डे हादगावमधील या कारवाईनंतर तालुक्यातील इतर कृषी सेवा केंद्रांमध्येही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच सेवा केंद्रांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील काळात अजूनही कडक पावले उचलली जातील, अशी शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Scheme : रोहयो घोटाळ्याची चौकशी पूर्ण; दोषींवर कारवाई की तडजोड?

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाखतेशेतकरीशेतीजालना