- अशोक परदेशीजळगाव : टोणगाव शिवारात पपई सोबत टरबूजचे पीक (Watermelon Intercropping In Banana Farm) घेणाऱ्या शेतकऱ्यावर या शेतात रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली आहे. टरबूजचा हंगाम यंदा फार दिवस चालला नाही. ऐन मे महिन्यातच टरबूजचे भाव गडगडले, त्यातच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) टरबूजची मागणीही कमी झाली. तसेच पिकाचे नुकसानही झाल्याने अखेर नाराज झालेल्या शेतकऱ्याने टरबूजवर रोटाव्हेटर फिरवला.
संजय लालचंद परदेशी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पावणेतीन महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच त्यांनी टरबूजची लागवड (Tarbuj Lagvad) केली होती. टरबूजवर खर्च करून मेहनतीने मळा फुलविला. माल काढणी योग्य झाला अन् नेमके त्याचवेळी टरबूजचे भाव कमी झाले. त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या पिकाला मोठा फटका बसला.
अखेर परदेशी यांनी पावसाळ्याच्या धास्तीने व पपई पीक वाचविण्यासाठी टरबूजवर रोटाव्हेटर मशीन फिरविण्याचा निर्णय घेतला. परदेशी यांनी टरबूजवर केलेला खर्चही निघाला नाही. मेहनतही वाया गेल्याने परदेशी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
खर्च सव्वा लाखाचा, हाती आले ३२ हजारपिकावर एकूण सव्वा लाख खर्च आल्याचे शेतकरी संजय परदेशी यांनी सांगितले. ८ टन मालाचा पहिला तोडा आला. मात्र टरबूजला ४ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. मालाच्या विक्रीतून हाती फक्त ३२ हजार रुपये आले. या पिकावर केलेला खर्चही निघाला नाही. टरबुजाचा ४० टन माल येण्याची अपेक्षा होती. मात्र पिकाला भाव कमीचा फटका बसला.
टरबूज पिकावर सव्वा लाख रुपये खर्च केला. मात्र भाव प्रति किलो फक्त ४ रुपये एवढा कमी मिळाला. त्यात अवकाळी पावसाचा फटकाही पिकाला बसला. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. पपई वाचविण्यासाठी टरबूजवर रोटाव्हेटर मशीन फिरविण्याचा निर्णय घ्यावा लागला.- संजय परदेशी, नुकसानग्रस्त शेतकरी, टोणगाव