- अंकुश गुंडावार
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक (Bhat Utpadak Shetkari) शेतकऱ्यांच्या नजरा सध्या बोनसकडे लागल्या आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने खते, बियाणे व खरीप हंगामपूर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना बोनसच्या (Paddy Bonus) रकमेची मोठी मदत होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा आधार असतो. बोनस आज मिळेल उद्या मिळेल असे सांगत सहा महिने लोटले पण अद्याप बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही.
त्यामुळे शेतकरी सुद्धा आता हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने आता बोनसची रक्कम (farmer Bonus) देण्यासाठी अधिक उशीर करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने जिल्ह्यातील अर्थव्यवस्था सुद्धा यावर अवलंबून आहे. शेतीचा लागवड खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेती म्हणजे तोटद्याचा सौदा झाला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना थोडी मदत म्हणून शासनाकडून सन २००३ प्रोत्साहन अनुदान बोनस देण्यास सुरुवात झाली. दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून बोनस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सन २०१९ मध्ये धानाला सर्वाधिक प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्यात आला; मात्र राज्यातील महायुती सरकारने धानाला प्रति क्विंटल बोनस ऐठजी हेक्टरी बोनस देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत दिला.
तर गेल्या वर्षीं नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केला. धानाला बोनसची घोषणा दिसेंबरमध्ये झाली पण त्यासंबंधीचा जीआर विधान सभेच्या मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निघाला. याला सुद्धा आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही शेतकन्यांच्या बैंक खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे बोनससाठी पात्र ठरलेले शेतकनी बोनस आला का म्हणून आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या पायन्या झिजवित आहेत; पण त्यांना केवळ पुन्हा प्रतीक्षा करा हेच सांगून परत पाठविले जात आहे.
खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यतामहायुती सरकारने जाहीर केलेल्या धानाच्या बोनसला (Dhan Bonus) जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यासाठी जवळपास २५० कोटी रुपये लागणार आहेत. हेक्टरी २० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस मिळणार आहे. त्यामुळे या रकमेतून शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोयीचे होणार होते; पण अद्यापही बोनस जमा झाला नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संकटात येण्याची शक्यता आहे.
बोनसवर फोकस
- हेक्टरी २० हजार रुपयांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मिळणार बोनस
- जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार
- शेतकरी ठरले बोनससाठी पात्र
- बोनससाठी लागणार एकूण २५० कोटी रुपयांचा निधी
- डिसेंबर २०२४ मध्ये हिवाळी अधिवेशनात झाली होती बोनसची घोषणा
बोनससाठी आश्वासनाचा सूरमहायुती सरकारमधील मित्र पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी हे लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा होईल असे सांगून त्यांना दिलासा देत आहेत, पण आता यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या विश्वास राहिला नाही. आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता आता सहा महिन्यांचा कालावधी नोटला असून अद्यापही बोनस जमा झाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंढी झाली आहे.