Join us

ई पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन, रात्री नोंदणी करा अन्.... शेतकऱ्यांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:00 IST

Pik Pahanai : ई-पीक पाहणी ॲपवर (Digital crop Survey) जीओ टेंगिंग सुविधा असल्याने प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करावी लागते.

Pik Pahanai :  खरीप हंगाम 2025-26 च्या पीक नोंदणीसाठी (E pik Pahani) शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हरवर जास्त लोड येत आहे. त्यामुळे पीक पाहणी नोंदणी करत असतांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो. परिणामी शेतकऱ्याचा असं भ्रम निर्माण होतो की ॲप चालत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाकडून महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. 

ई-पीक पाहणी ॲपवर (Digital crop Survey) जीओ टेंगिंग सुविधा असल्याने प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करावी लागते. प्रत्यक्ष शेतात असूनही अक्षांश-रेखांश न मिळणे, फोटो क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड होण्यासाठी बराच वेळ लागणे किंवा ॲप पुन्हा नव्याने सुरू होणे,

सर्व्हरच्या संथ गतीमुळे ई-पीक पाहणीच्या ॲपला पुरेशा प्रमाणात त्याची जोड मिळत नसल्याने पीक नोंदणीत अडथळे येत आहेत. शेतकरी वारंवार प्रयत्न करून कंटाळले आहेत.

  • यामुळे शेतकऱ्यांनी रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये (गावात/शहरात) असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा. 
  • सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पुर्ण करा. 
  • रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये येऊन मोबाईल ॲप मधील 'अपलोड वटन दाबून डेटा सेव्ह करा. 
  • यामुळे काय होईल. सर्व्हर लोड कमी होईल.
  • आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही.
  • पिकाची नोंदणी सहज पूर्ण होईल.

 

शेतकऱ्यांना आवाहन ही सूचना शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असून कृपया वेळेत नोंदणी करून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणीसाठी ४५ दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक पाहणी लावणे गरजेचे आहे. यावेळेस शासनाकडून गुगल प्ले स्टोअरवर ई-पीक पाहणीचे ४.०.० हे व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे; पण या ॲपवरून शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :कृषी योजनाशेतीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र