जळगाव : यंदाच्या पावसाळ्यात रानभाज्यांची (Ranbhaji) आवक सुरू झाली आहे. दुडीच्या फुलांनी बाजारात 'एंट्री' घेतली असून, नैसर्गिकरीत्या जीवनसत्त्वयुक्त, पोषक व प्रतिकारशक्ती वाढवणारी दुडीची फुलांच्या भाजीला चांगलीच मागणी असते.
शेतातील बांधावर, डोंगररांगांत नैसर्गिकरीत्या दुडीची फुले (Dudichi Fule) दिसून येतात. सध्या दुडीच्या फुलांची विक्री ४० रुपये प्रतिवाट्याप्रमाणे सुरू आहे. साधारणतः २०० रुपये किलोप्रमाणे या भाजीचा सध्या दर आहेत. पनीर 'दोडी' किंवा 'दुडीची फुले' म्हणूनही ओळख असलेल्या दुडीची फुले भाजीही करता येते. ती भाकरी किंवा पोळीसोबत खाल्ली जाते.
असा फुलवा स्वाददोडीच्या फुलांना देठापासून मोकळे करून स्वच्छ धुवायची. त्यानंतर तेलात आधी जिरे टाकायचे, बारीक लसूण व कांदा कापून तो परतायचा.त्यानंतर त्यात हिरवी मिरची किंवा लाल चटणी टाकून त्यात ही दोडीचे फुले टाकून त्यावर झाकण झाकल्यास अतिशय लज्जतदार भाजी तयार होते. याचप्रकारे झुणका, फुणके, भजे, धपाटेही तयार केले जातात. या भाजीचे तयार केलेले सर्वच पदार्थ पचायला हलके व प्रतिकारशक्ती वाढवणारे असतात.
अशी आहे पौष्टिकतादुडीच्या फुलांमध्ये विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. या भाजीमध्ये असलेले घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. दुडीची फुले नैसर्गिकरीत्या जंगलात किंवा वेलींवर वाढतात, त्यामुळे ती शुद्ध आणि ताजीतवानी असतात. साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही ही फुले पोषक असतात.