Join us

Drone Favarani : एकरावर ड्रोन फवारणीसाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:55 IST

Drone Favarani : फवारणी अधिक कार्यक्षमतेने करता येते. या पार्श्वभूमीवर अनेक भागात शेतकरी ड्रोन फवारणीला प्राधान्य देत आहेत. 

नाशिक : मालेगाव तालुक्यातील आघार बु, येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमांने शेतीशाळेचा तिसरा वर्ग आयोजित करण्यात आला. खरीप हंगामातील मका पिकाच्या (Maize Crops) उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत या वर्गात अनेक मार्गदर्शन सत्र घेतले गेले.

काही वर्षांपासून ड्रोनने फवारणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. ड्रोन फवारणी म्हणजे शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा खते फवारण्यासाठी ड्रोनचा वापर करणे. यामुळे वेळेची बचत होऊ लागली आहे, मजुरांची गरज कमी होत आहे आणि फवारणी अधिक कार्यक्षमतेने करता येते. या पार्श्वभूमीवर अनेक भागात शेतकरी ड्रोन फवारणीला प्राधान्य देत आहेत. 

यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शीतल सावळे यांनी कीड-रोग नियंत्रण, सेंद्रिय निविष्ठा आणि नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत बीआरसी स्थापन यावर मार्गदर्शन केले. यावेळी माऊली पाटील यांनी पारंपरिक आणि जोड ओळ पद्धतीतील फरक स्पष्ट करत सांगितले की, जोड ओळ पद्धतीमुळे प्रति एकर झाडांची संख्या वाढते, योग्य अंतरामुळे प्रत्येक झाडास प्रकाश संश्लेषण योग्य प्रमाणात मिळते आणि यामुळे कणसाचे वजन तसेच उत्पादनवाढ साध्य होऊ शकते.

ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिकइफको नाशिकचे व्यवस्थापक नितीन उमराणी यांनी ड्रोनद्वारे मका पिकावर नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति एकर दराने ड्रोन सेवा सवलतीत उपलब्ध करून दिली जाणार असून, गट पद्धतीने मागणी केल्यास ही सेवा थेट शेतावर दिली जाईल.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनानाशिक