Join us

Dhan Biyane Case : भेसळ बियाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान; ७.४६ लाख भरपाईचा आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:16 IST

Dhan Biyane Case : रामटेक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना भेसळयुक्त धान बियाण्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सिपना सीड कंपनीला ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची भरपाई, त्यावर ९ टक्के व्याज आणि इतर खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामातील या प्रकरणात कृषी विभागाच्या पंचनाम्यात बियाण्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले होते. (Dhan Biyane Case)

Dhan Biyane Case : रामटेक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना भेसळयुक्त धान बियाण्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कंपनीला भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.(Dhan Biyane Case)

सिपना सीड कंपनीला ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची भरपाई, त्यावर ९ टक्के व्याज आणि इतर खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. २०१९ च्या खरीप हंगामातील या प्रकरणात कृषी विभागाच्या पंचनाम्यात बियाण्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले होते.(Dhan Biyane Case)

कंपनीने शेतकऱ्यांना विक्रेत्यांमार्फत धानाचे भेसळ बियाणे विकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याप्रकरणी रामटेक तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना एकूण ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची नुकसान भरपाई तसेच ९ टक्के व्याज व इतर खर्च देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बियाणे उत्पादक कंपनीला दिले आहे. हा प्रकार सन २०१९ च्या खरीप हंगामातील आहे.(Dhan Biyane Case)

सन २०१९ च्या खरीप हंगामात मानापूर (ता. रामटेक) येथील सात शेतकऱ्यांनी रामटेक शहरातील राहुल कृषी सेवा केंद्रातील अकोला येथील सिपना सीड कंपनीचे केसर अ-१ नामक धानाच्या वाणाचे बियाणे खरेदी केले आणि त्याची रोवणी केली. (Dhan Biyane Case)

या सातही शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या अर्ध्या पिकाला आणि अर्ध्या पिकाला काही उशिरा म्हणजे काही दिवसांनी लोंब्या आल्या. त्यामुळे या पिकाची कापणी करून मळणी करणे त्रासदायक गेले आणि यात त्यांची फसवणूक होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. (Dhan Biyane Case)

या वाणात भारी व हलक्या बियाण्याची भेसळ असल्याचे स्पष्ट होताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी अधिकाऱ्यांनी लगेच पिकाचा पंचनामा करून अहवाल तयार केला. एकाच पिकातील ५३.९२ टक्के बियाणे आधी निसवले आणि ४६.०८ टक्के बियाणे उशिरा निसवल्याचे कृषी विभागाने त्यांच्या अहवालात नमूद केले. (Dhan Biyane Case)

या अहवालाच्या आधारे मानापूर येथील पुरुषोत्तम मोहोड, काशिनाथ सावरकर, दिलीप मानकर, जगदीश आष्टनकर व मारोती ठाकरे या शेतकऱ्यांनी सिपना सीड कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करताच या शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली.(Dhan Biyane Case)

या प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे, सदस्य मिलिंद केदार व शीतल पेटकर यांच्या पीठाने नुकताच निवडा दिला असून, या पाचही शेतकऱ्यांना सिपना सीड कंपनीने ४५ दिवसांच्या आत एकूण ७ लाख ४६ हजार ७४८ रुपयांची नुकसान भरपाई, त्यावर ९ टक्के आणि इतर खर्च देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या वतीने ॲड. दादाराव भेदरे, ॲड. आशिष भेदरे, ॲड. अंकित भेदरे व ॲड. योगेश्वरी भेदरे (घाटे) यांनी युक्तिवाद केला.(Dhan Biyane Case)

कुणाला किती नुकसान भरपाई ?

सिपना सीड कंपनीने जगदीश आष्टनकर यांना १ लाख ८९ हजार ८८६ रुपये व या रकमेवर २ जून २०२१ पासून ९ टक्के व्याज, आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासबाबत ४० हजार रुपये व तक्रारीचा खर्च १० हजार रुपये, पुरुषोत्तम मोहोड यांना १ लाख ७४ हजार रुपये व इतर खर्च, दिलीप मानकर यांना १ लाख ७२ हजार ८६२ रुपये व इतर खर्च, काशिनाथ सावरकर यांना ६० हजार व इतर खर्च तसेच हैदराबाद येथील पाटुरू सीड कंपनीने मारोती ठाकरे यांना १ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई, आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाबाबत ३० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्चरपोटी व १० हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Kapas Biyane Case : शेतकऱ्याचा विजय: सदोष कापूस बियाणे प्रकरणी ग्राहक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीभातपीकखरीप