यवतमाळ : सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने कृषिधन सीड्स प्रा. लि. या कंपनीविरुद्ध महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Defective Soybean Seeds)
संबंधित शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याचा आदेश आयोगाने सुनावला असून, भेसळयुक्त बियाण्यांच्या विक्रीप्रकरणी ही कारवाई लक्षणीय ठरली आहे.(Defective Soybean Seeds)
तक्रारीची पार्श्वभूमी
कामठवाडा (चाणी), ता. दारव्हा येथील शेतकरी उमेश भानुदास उके यांनी यवतमाळ येथील वैभव एजन्सीमार्फत कृषिधन सीड्सचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते.
पेरणीनंतर उगवलेल्या पिकावर अपेक्षित वाढ दिसून आली नाही. झाडांना पांढरी फुले आली, बुरशीजन्य संसर्ग आढळला आणि शेंगा न लागल्याने उत्पादन पूर्णपणे घटले.
यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार उके यांनी स्थानिक तक्रार निवारण समितीकडे केली. समितीने प्रत्यक्ष पंचनामा व तपासणी करून दिलेल्या अहवालात तब्बल ५० टक्के बियाणे सदोष व भेसळयुक्त असल्याचे नमूद केले.
ग्राहक आयोगात धाव
बियाणे कंपनीकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने उके यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाद मागितली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे व सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली.
तक्रार निवारण समितीचा अहवाल या प्रकरणात निर्णायक ठरला. सदोष बियाण्यांमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे आयोगाने ग्राह्य धरले.
असा आहे आदेश
आयोगाने कृषिधन सीड्स प्रा. लि., जालना यांना पुढीलप्रमाणे रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत.
* ७५,००० रुपये – आर्थिक नुकसानभरपाई* १०,००० रुपये – शारीरिक व मानसिक त्रासापोटी* ५,००० रुपये – तक्रार खर्च
एकूण ९० हजार रुपये संबंधित शेतकऱ्यास देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
या निर्णयामुळे सदोष बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना स्पष्ट संदेश मिळाला असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक आयोग प्रभावी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
बियाणे खरेदी करताना अधिकृत पावती, बॅच क्रमांक व नमुने जतन करण्याचे महत्त्वही या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
सदोष बियाण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीविरोधात शेतकरी कायदेशीर मार्ग अवलंबू शकतात, याचा हा महत्त्वाचा दाखला मानला जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : BT Cotton Seeds : नांदेडच्या मातीने दिली 'बियाणे स्वातंत्र्या'ची नवी उमेद वाचा सविस्तरChia Seeds Farming : चार महिन्यांत उत्पन्न हाती; चिया सीड्स बनतंय शाश्वत शेतीचा गेमचेंजर वाचा सविस्तर
Web Summary : Yavatmal consumer forum orders Agri Dhan Seeds to compensate farmer Umesh Uke ₹90,000 for defective soybean seeds causing crop failure. The committee found 50% of seeds faulty.
Web Summary : यवतमाल उपभोक्ता फोरम ने कृषि धन सीड्स को किसान उमेश उके को खराब सोयाबीन के बीज से फसल खराब होने पर ₹90,000 का मुआवजा देने का आदेश दिया। समिति ने 50% बीज खराब पाए।