Cultivation : राज्यात शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. प्रत्यक्ष पेरणीला काहीच दिवस उरल्याने सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यात व्यस्त आहे. (Mashagat)
भोकरदन तालुक्यासह आन्वा, वाकडी, कुकडी, कठोरा बाजार, जानेफळ गायकवाड व परिसरात एकीकडे लग्नसराई, तर दुसरीकडे शेतीच्या मशागतीच्या (Cultivation) कामाची घाई सुरू आहे. (Mashagat)
त्यामुळे अनेकांनी लग्नसराईकडे दुर्लक्ष करून शेतीच्या कामाकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. आता आंतरमशागतीसाठी केवळ २० ते २५ दिवस उरले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. (Cultivation)
भोकरदन तालुक्यात यंदा १ लाख ९ हजार हेक्टरवर खरीप पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार पेरणीसाठी लागणाऱ्या खते, बी-बियाणे व औषधांची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदवली आहे. (Cultivation)
पावसाळा २५ दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शेतकरी आता पेरणीच्या दिशेने वळला आहे. शेतात खरीपपूर्व मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे.
यंदा दोन्ही हंगामातील पिकांना फटका बसला असल्याने शेतकरी सध्या बँकेसह सावकारांचे उंबरठे आगामी पेरणीसाठी झिजवताना दिसत आहे. दरवर्षी जून महिन्यात मोसमी पाऊस झाल्यानंतर प्रत्यक्ष खरीप पेरणीला सुरुवात होते.
मागील वर्षी अतिवृष्टीत खरिपातील पिकाचे होत्याचे नव्हते झाले. रब्बीतही अवकाळीने शेतकऱ्यांचा घात केला. अशा परिस्थितीत आता तोंडावर येऊन ठेपलेल्या खरीपाचे नियोजन सुरू आहे.
आरोग्याची काळजी घ्यावी
* आन्वा परिसरात उष्माघाताच्या अनेक घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सकाळच्या वेळेत शेतीची कामे करावीत.
* तसेच जेवणामध्ये कांदाही असावा, कामे आटोपताच झाडाच्या सावलीत काही काळ विसावा घ्यावा. वारंवार पाणी पिणे आवश्यक आहे. * विशेषतः शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
* १०० शेतकरी रब्बीतील पिके काढून घेत खरीपाच्या मशागतीला गुंतला आहे. १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची मिरचीसाठी धावपळ सुरू आहे.
बळीराजासह परिवाराची होते चांगलीच दमछाक
प्रत्यक्ष पेरणीला २५ दिवस उरल्याने सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यास शेतकरी व्यस्त आहे. अनेक शेतातून कपाशीची फरदड उपटणे, ज्वारी, मका, भुईमूग आदी पिकांचा चारा गोळा करणे, काडीकचरा पेटवणे, शेणखत टाकने आदी कामे केली जात आहे. त्यामुळे बळीराजासह परिवाराची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच बळीराजाला नातेवाइकांच्या लग्न समारंभाला हजेरीही लावावी लागत आहे.
मशागत यंत्रांची मागणी वाढली
सध्या ट्रॅक्टरची मागणी प्रचंड असून अनेक ठिकाणी प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. मागणी जास्त आणि उपलब्धता मर्यादित असल्यामुळे मशागतीच्या यंत्रणांच्या दरात वाढ झाली आहे.
ट्रॅक्टरचे प्रतिएकर दर
मशागतीचे काम | अंदाजे दर (₹) |
---|---|
नांगरणी | १८०० |
कल्टिवेटर | १४०० |
रोटावेटर (रोट्या) | १४०० |
वखरपाळी | १२०० |
पेरणी | १२०० |