Lokmat Agro >शेतशिवार > Crop Loan : यंदाच्या हंगामात कुठल्या पिकाला सर्वाधिक कर्जदर, जाणून घ्या पीकनिहाय यादी 

Crop Loan : यंदाच्या हंगामात कुठल्या पिकाला सर्वाधिक कर्जदर, जाणून घ्या पीकनिहाय यादी 

latest News Crop Loan rates Which crop has highest loan rate, know the crop-wise list | Crop Loan : यंदाच्या हंगामात कुठल्या पिकाला सर्वाधिक कर्जदर, जाणून घ्या पीकनिहाय यादी 

Crop Loan : यंदाच्या हंगामात कुठल्या पिकाला सर्वाधिक कर्जदर, जाणून घ्या पीकनिहाय यादी 

Crop Loan : २०२५-२६ च्या हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवे पीक कर्जदर (Crop Loan rates) जाहीर केले आहेत.

Crop Loan : २०२५-२६ च्या हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवे पीक कर्जदर (Crop Loan rates) जाहीर केले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : यंदाच्या खरीप, रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्षे फळपिकासह (Fruit Farm Crops) हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात 'जेमतेम' तरतूद केली आहे. कुठल्या पिकाला कसा कर्जदर (Crop loan) असणार आहे, हे सविस्तर पाहुयात.. 

२०२५-२६ च्या हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवे पीक कर्जदर (Crop Loan rates) जाहीर केले आहेत. या समितीने ४४ पिकांसाठी कर्जदर निश्चित केले आहेत. त्यात खरीप, फळ, उन्हाळी, भाजीपाला, फूल, चारा पिकांचा समावेश आहे. सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवे किमान व कमाल पीककर्ज दरानुसार जिल्हा बँकांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

'स्ट्रॉबेरी'ला लाली
फुलपिकात निशिगंधाच्या लागवडीसाठी ५० ते ९० हजारांची शिफारस करण्यात आली आहे. 'गुलाब' शेतीला मात्र ५० ते ६५ हजारांची मर्यादा आहे. भाजीपाला, फूल, चारा पिकांचा समावेश आहे. सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवे किमान व कमाल पीककर्ज दरानुसार जिल्हा बँकांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. फळपिकात स्ट्रॉबेरीसाठी २ लाख ६० हजार ते ५ लाख ४० हजारांच्या मर्यादित कर्ज उपलब्ध होणार आहे. द्राक्षानंतर सर्वाधिक कर्जदर उभ्या स्वरूपाच्या स्ट्रॉबेरीला लाभणार आहे.

पीक निहाय कर्जदर कसे? 
ज्वारीला किमान 33000 तर कमाल 56 हजार, बाजरीला किमान 32 हजार तर कमाल 54 हजार, मक्याला किमान 36 हजार तर कमाल 65 हजार, तुरीला किमान 47 हजार तर कमाल 65 हजार, भुईमुगाला किमान 45 हजार तर कमाल 62 हजार, सोयाबीनला किमान 58 हजार तर कमाल 75 हजार, सूर्यफुलाला किमान 27 हजार तर कमाल 40 हजार कापूस किमान 60 हजार तर कमाल 85 हजार रुपये असा कर्जदर असणार आहे. 

तसेच ऊस पिकाला किमान एक लाख 25 हजार तर कमाल एक लाख 80 हजार, मिरची किमान 85 हजार तर कमाल एक लाख तीस हजार, टोमॅटो किमान 96 हजार तर कमाल एक लाख 35 हजार, हळद किमान एक लाख तीस हजार तर कमाल एक लाख 70 हजार, लसूण किमान 72 हजार तर कमाल 80 हजार, द्राक्ष किमान तीन लाख 75 हजार तर कमाल पाच लाख, केळी किमान एक लाख पंधरा हजार तर कमाल दोन लाख, हापूस आंबा किमान दोन लाख तर कमाल दोन लाख 50 हजार रुपये असा पिकनिहाय कर्जदार असणार आहे.

Web Title: latest News Crop Loan rates Which crop has highest loan rate, know the crop-wise list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.