Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातबाऱ्यावर गावाचे नाव चुकले, दुरुस्तीसाठी कुणाकडे अर्ज करायचा, कोणती कागदपत्रे जोडायची? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:50 IST

Satbara Utara : सातबाऱ्यावर गावाचे नाव किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी.....

Satbara Utara : सातबाऱ्यावर (7/12 उतारा) गावाचे नाव किंवा इतर कोणतीही माहिती चुकीची असल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम १५५ (Maharashtra Land Revenue Code, 1966 Section 155) अंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करणे आवश्यक आहे. 

गावचे नाव दुरुस्त करण्यासाठी खालील प्रक्रिया आणि कागदपत्रे आवश्यक आहेत :

आवश्यक कागदपत्रे 
अर्ज :
तलाठी किंवा तहसीलदारांच्या नावे अर्ज
पुरावा : योग्य गावाची नोंद असलेला सरकारी दस्तऐवज (उदा. आधार कार्ड, रेशन कार्ड, खरेदीखत, किंवा जुना योग्य सातबारा)
शपथपत्र  : नाव किंवा गाव चुकीचे असल्याचे प्रतिज्ञापत्र

अर्ज कुठे आणि कसा करावा?

  • ऑफलाईन पद्धत : आपल्या गावाच्या तलाठी कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करा आणि तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे सादर करा. 
  • ऑनलाईन पद्धत : महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख पोर्टलवर 'ई-हक्क' (e-Hakk) द्वारे ऑनलाइन दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता. 
  • प्रक्रिया अर्ज सादर करणे : तुम्ही अर्जात योग्य गावाची माहिती भरून तो सादर करा. 
  • तलाठी चौकशी : तलाठी कागदपत्रांची पडताळणी करतील. 
  • फेरफार नोंद : तलाठी योग्य दुरुस्ती करून फेरफार नोंद घेतील. 
  • मंडल अधिकारी मंजुरी : त्यानंतर, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार तो फेरफार मंजूर करतील आणि दुरुस्त सातबारा तुम्हाला मिळेल. 

 

 

Gas Cylinder KYC : केवायसी केली तरीही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचे नवे नियम पहा!

 

English
हिंदी सारांश
Web Title : Correcting Village Name on 7/12 Extract: Application Process Explained.

Web Summary : To correct village name errors on the 7/12 extract, apply to the Tahsildar under Section 155. Submit an application, proof of correct village name (like Aadhar or old 7/12), and an affidavit. Apply offline at the Talathi office or online via MahaBhulekh's e-Hakk portal.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्रजमीन खरेदी