Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gas Cylinder : आता व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी 'हे' सर्टिफिकेट बंधनकारक, गॅस वितरकांमार्फत प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:30 IST

LPG gas Cylinder : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केवळ अधिकृत करण्यासाठी व्हावा आणि त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी..

मालेगाव : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केवळ अधिकृत करण्यासाठी व्हावा आणि त्याचा काळाबाजार किंवा गैरवापर रोखला जावा, यासाठी आता व्यावसायिक ग्राहकांना 'एंड यूज सर्टिफिकेट' (ईयूसी) सादर करणे बंधनकारक केले आहे. गॅस वितरकांमार्फत हे प्रमाणपत्र ग्राहकांकडून भरून घेतले जात आहे.

अनेकदा व्यावसायिक गॅसचा वापर घरगुती कामांसाठी किंवा अनधिकृत ठिकाणी केला जातो. हे टाळण्यासाठी गॅस कंपन्यांनी आता ग्राहकांकडून लेखी हमीपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. या अर्जामध्ये ग्राहकाला आपल्या आस्थापनेचे नाव, पत्ता, जीएसटी क्रमांक आणि गॅस वापराचे नेमके कारण स्पष्ट करावे लागणार आहे. 

या नवीन नियमामुळे गॅस वितरणाचे रेकॉर्ड पारदर्शक होणार आहे. व्यावसायिक कारणांसाठी घेतलेला गॅस इतरत्र वळवला जात असेल, तर त्यावर या प्रमाणपत्राद्वारे नियंत्रण मिळवणे सोपे होणार आहे. व्यावसायिक ग्राहकांनी हे प्रमाणपत्र वेळेत भरून आपल्या वितरकाकडे जमा करण्याचे आवाहना करण्यात आले आहे. हॉस्पिटल व शासकीय हॉस्टेलसाठीच व्यावसायिक गॅसचा पुरवठा होत आहे.

आठवडाभरात प्रक्रियाव्यावसायिक ग्राहकांसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी तेल वितरण कंपन्यांनी ग्राहकांकडून 'ईयूसी' प्रमाणपत्र भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व एजन्सी व्यावसायिक ग्राहकांकडून हे प्रमाणपत्र भरून घेत आहेत. हे प्रमाणपत्र कंपनीकडे पाठवले जात असून, मागणीनुसार येत्या आठवडाभरात व्यावसायिक गॅसचा पुरवठा होईल.

प्रमाणपत्रात काय माहिती द्यावी लागेल ?वापराचा उद्देश : गॅसचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, हॉस्पिटल की हॉस्टेलसाठी केला जात आहे, याची स्पष्ट नोंद करावी लागेल.वापर मर्यादा : एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळात किती गॅस वापरला आणि पुढे किती गरज आहे, याची माहिती द्यावी लागेल.हमीपत्र : गॅसचा पुरवठा तिसऱ्या व्यक्तीला केला जाणार नाही किंवा त्याचा कोणताही गैरवापर होणार नाही, अशी लेखी ग्वाही ग्राहकाला द्यावी लागेल.दंडनीय कारवाई : जर ही माहिती चुकीची आढळली किंवा गॅसचा गैरवापर झाला, तर गॅस पुरवठा खंडित करण्यासोबतच कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही यात देण्यात आला आहे.

 

हेही वाचा   : आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Commercial Gas Cylinder: 'End Use Certificate' Mandatory Now

Web Summary : Commercial LPG users must now submit an 'End Use Certificate' (EUC) to prevent misuse. This ensures proper usage, transparent records, and helps control unauthorized diversion. Distributors are collecting the certificates, needed for renewed supply. False information leads to penalties.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईगॅस सिलेंडरशेती क्षेत्रशेतकरी