Join us

Chilli Crop Protection : उन्हाळी मिरचीचे नुकसान वाढले; खर्च जास्त, भाव कमी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:02 IST

Chilli Crop Protection : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उन्हाळी मिरचीवर बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे.औषधांवर मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम न दिसल्याने आणि बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Chilli Crop Protection)

Chilli Crop Protection : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उन्हाळी मिरचीवर बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे.(Chilli Crop Protection)   

औषधांवर मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम न दिसल्याने आणि बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Chilli Crop Protection)   

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण, गाडेगव्हाण, सातेफळ, पोखरी, डोणगाव, अकोला देव या परिसरातील शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी मिरची पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. (Chilli Crop Protection)   

त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Chilli Crop Protection)   

उन्हाळी हंगामात मिरचीला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने लागवड केली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून वातावरणातील तापमानातील चढ-उतार, दमट हवामान आणि पाणी व्यवस्थापनातील अडचणींमुळे पांढरी माशी, झाड वाळणं, बुरशी आणि करपा यांसारखे रोग झपाट्याने पसरले आहेत. काही ठिकाणी तर झाडे पूर्णपणे सुकून गेली आहेत.(Chilli Crop Protection)   

औषधांवर मोठा खर्च, तरीही अपेक्षित परिणाम नाही

रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी रासायनिक कीटकनाशके आणि महागडी औषधे फवारत आहेत. एका एकरावर महिन्याला किमान ३ हजार ते ५ हजार रुपयांचा खर्च होत आहे. तरीही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने उत्पादन घटतच आहे.

सध्या औषधांचा खर्च खूप वाढला आहे, पण आज ना उद्या रोगाचा नायनाट होईल या आशेने फवारणी सुरू आहे. तरीही पीक वाचत नाही. कृषी विभागाने लक्ष घालून मार्गदर्शन करावे.- सोमीनाथ अंभोरे, शेतकरी

बाजारभावातही घसरण

उत्पादन घटल्यावरही बाजारभाव वाढण्याऐवजी घसरला आहे. सध्या जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीला केवळ ३ हजार ते ४ हजार प्रति क्विंटल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन कमी आणि भाव कमी अशा दुहेरी आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.

मिरचीवरील रोग व्यवस्थापन 

बुरशी व करपा रोग नियंत्रण

* पिकाला पाणी देताना पानांवर पाणी साचू देऊ नये.

* कॉपर ऑक्सिक्लोराईड, मॅन्कोझेब किंवा कॅप्टन यांसारख्या बुरशीनाशकांची शिफारशीनुसार फवारणी करावी.

झाड वाळणं टाळण्यासाठी

* ओलावा जास्त राहणार नाही याची काळजी घेऊन निचरा व्यवस्था सुधारावी.

* मातीतील रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा पिकाच्या मुळांजवळ जैविक फंगीसाइड्स वापरावेत.

हे ही वाचा सविस्तर : Chilli Market : बाजारात उतरला हिरव्या मिरचीचा ठसका; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनजालनाखते