Murghas Sayantra Vatap : राज्यात "मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (राज्यस्तरीय योजना)" लागू करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील वैरण विकास योजना" अंतर्गत "मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे" ही योजना राबविण्यात येते.
मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समुहगटाचा समावेश करण्यात येत आहे. यामध्ये खालीलप्रमाणे समूहगट सहभागी होऊ शकतात. याबाबत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अ) सहकार अधिनियम / धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था (FPO) / सहकारी संस्थाआ) कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)इ) आत्मा अंतर्गत (तालुका कृषी अधिकारी यांचे नोंदणी प्रमाणपत्र असलेला नोंदणीकृत संस्था शेतकरी समुह गट (Farmers Group)ई) महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेला समुदाय आधारीत संसाधन केंद्र (Community Managed Resource Centre)उ) उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघ
पात्रता :
- संस्थेचे किमान ५० शेतकरी सदस्य असावेत.
- संस्थेचे भागभांडवल / खेळते भागभांडवल किमान रु. ५ लक्ष असावे.
- संस्थेचे लगतच्या मागील ३ वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे
- लेखापरीक्षण अहवालानुसार संस्था नफ्यात असावी.
अटी : अ) सदर योजनेंतर्गत प्राप्त होणारे लाभधारकांचे अर्ज विचारात घेऊन वरील समुह गटांना प्राधान्य देण्यात येईल.आ) वैरण विकास योजना" अंतर्गत "मुरघास संयंत्र वाटप योजनेव्दारे उद्योजकता विकास करणे" या योजनेमध्ये नमूद इतर अटी जसाच्या तशा लागू राहतील.
Web Summary : The Murghas plant distribution scheme now includes farmer groups like FPOs and farmer producer companies. Groups must have 50+ members, ₹5 lakh capital, and a profitable audit for the last 3 years to qualify. Priority is given to these groups.
Web Summary : मुरघास संयंत्र वितरण योजना में अब किसान समूह जैसे एफपीओ और किसान उत्पादक कंपनियां शामिल हैं। समूहों के पास 50+ सदस्य, ₹5 लाख पूंजी और पिछले 3 वर्षों के लिए एक लाभदायक ऑडिट होना चाहिए। इन समूहों को प्राथमिकता दी जाएगी।