Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिलाई मशीन, तुषार सिंचन, मोटार पंप आणि ताडपत्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 18:35 IST

Agriculture Scheme : सेसफंड व वनमहसुल योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Agriculture Scheme :  वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विविध लाभ योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सेसफंड व वनमहसुल योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागासवर्गीय नागरिक व आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध लाभ उपलब्ध करण्यात आला आहे. 

उपलब्ध लाभ :

  • स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन (पुरुष व महिला)
  • मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री
  • मोटार पंप वितरण
  • तुषारसंच / Sprinkler Set
  • मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिरांसाठी अभ्यासिका
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण
  • वनमहसुल 7 टक्के योजनेत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 19 डिसेंबर 2025इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत.पुढील प्रक्रिया : संबंधित पंचायत समितीमार्फत पडताळणी केलेले अर्ज 24 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे सादर करावेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Washim District Invites Applications for Agriculture Scheme Benefits

Web Summary : Washim district offers sewing machines, tarpaulin, motor pumps, and sprinkler sets for eligible backward class and tribal farmers. Apply by December 19, 2025, at Panchayat Samiti offices with required documents.
टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशेतकरीसरकार