Business Idea : जर तुमच्याकडे शेती कमी असेल किंवा शेतीतून फारस उत्पन्न मिळत नसेल तर तुम्ही कमी जागेत, कमी जागेत एखादा व्यवसाय उभारू शकतात.
ज्या व्यवसायाच्या कमी गुंतवणुकीतून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. शेतीपूरक असणाऱ्या व्यवसायांपैकी तीन असे व्यवसाय आहेत ते तुम्ही कमी जागेत करू शकता, ते कोणते तीन व्यवसाय आहेत, त्याची माहिती घेऊयात...
मधमाशी पालन
आजकाल सेंद्रिय शेतीकडे अनेक जण वळू लागले आहेत. यासाठी कृषी उत्पादने वाढविण्यासाठी बहुतांश वेळा पिकांमध्ये मधमाशांच्या मदतीने परागीभवन घडवून आणले जाते. म्हणूनच मधमाशी पालन हा शेतीवर आधारित पूरक व्यवसाय ठरू शकतो.
ज्यामुळे मध, मेण, परागकण यांसारखी उत्पादने मिळतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. तसेच मधमाश्यांच्या मदतीने पिकांचे परागीकरण होऊन कृषी उत्पादन वाढते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB) आणि इतर संस्था या व्यवसायासाठी प्रशिक्षण व साहित्य पुरवतात. तसेच उत्पादने विक्रीसाठी मदतही करतात. त्यामुळे मधमाशीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे.
पोल्ट्री फार्म
पोल्ट्री फार्म (Poultry Farm) म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय. पोल्ट्री फार्मसाठी शेड उभारणी, कोंबड्यांची खरेदी आणि खाद्य यासाठी प्रारंभिक गुंतवणूक लागते. या व्यवसायासाठी सरकारकडून कर्ज आणि अनुदान योजना देखील उपलब्ध आहेत. पोल्ट्री फार्ममधून अंडी आणि कोंबडी विक्रीद्वारे उत्पन्न मिळते. बाजारातील मागणीनुसार या किमती बदलू शकतात.
एक बॅच ४५ दिवसांनी येते. त्यामुळे दीड महिन्यात पैसे मिळतात. शिवाय पौल्ट्रीचे मार्केट कायमच फायदेशीर असते. त्यामुळे खूप कमी प्रमाणात नुकसान होते. काही शेतकऱ्यांनी कमी गुंतवणुकीतही पोल्ट्री फार्म सुरू करून यश मिळवले आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीतून अधिक नफा देणारा हा व्यवसाय आहे.
मशरूम शेती
मशरूम शेती हा कमी भांडवल आणि कमी जागेत सुरू करता येणारा फायदेशीर व्यवसाय आहे. ज्यामध्ये गहू, भात, सोयाबीनचा भुसा , बियाणे आणि इतर आवश्यक सामग्री वापरून मशरूमची लागवड केली जाते. शहरातील हॉटेल व्यवसायिक आणि शहरी लोकांसाठी मशरूमची चांगली मागणी असते. विविध ठिकाणी मशरूम लागवडीचे प्रशिक्षण उपलब्ध असून, त्यामुळे व्यवसायात अधिक यश मिळू शकते.