Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज नाही, काय आहे नवीन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 19:40 IST

Ration Vatap : यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही.

भंडारा : राज्य शासनाने रेशनकार्ड धारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. यानुसार रेशन दुकानदारांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिलमध्येच वितरित करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धान्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. पण, धान्याच्या उपलब्धतेनुसार धान्य वितरीत केले जाणार आहे. 

कोणत्या रेशन कार्डधारकांना दिलासा ?यामध्ये अंत्योदय अन्न योजने (एएवाय) अंतर्गत येणारे अत्यंत गरीब कुटुंब, तसेच प्राधान्य गट (पीएचएच) यामधील लाभार्थी यांचा समावेश आहे. या दोन्ही गटांतील नागरिकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच दिले जाणार आहे.

कोणते धान्य किती किलो मिळणार ?प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्त्ती, प्रति महिना पाच किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १५ किलो प्रति व्यक्ती धान्य मिळणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलो थान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १०५ किलो प्रति कुटुंब धान्य मिळणार आहे. यामध्ये तांदूळ आणि गहू यांचा समावेश असतो.

कशामुळे घेतला निर्णय ?कडक उन्हात नागरिकांना वारंवार रेशन दुकानांवर जावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना उन्हातान्हात होणारा त्रास टाळण्यासाठी हा उपाय केला आहे.

अंगठ्याशिवाय रेशन नाहीराज्यात रेशन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केली आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ration card holders need not visit shops for two months.

Web Summary : Maharashtra government to provide three months ration in April itself. This benefits Antyodaya and Priority Household cardholders, reducing frequent visits during summer. Biometric verification is mandatory.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना