Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी भोकरीची रानभाजी, भाजी कुठे मिळेल अन् कशी बनवायची? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 19:35 IST

Bhokari Ranbhaji : औषधी गुणधर्मानी परिपूर्ण असलेल्या 'भोकर' या रानभाजीचा सध्या चांगला बहर आलेला दिसून येत आहे.

नंदुरबार : सातपुडा परिसरात औषधी गुणधर्मानी परिपूर्ण असलेल्या 'भोकर' या रानभाजीचा सध्या चांगला बहर आलेला दिसून येत आहे. रस्त्यांच्या कडेला आणि स्थानिक बाजारांमध्ये ही भाजी तब्बल दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील लहान मुले व आदिवासी बांधवाना रोजगार मिळाला आहे. 

सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात आणि मार्च महिन्यात नैसर्गिकरीत्या मिळणारी भोकर ही दुर्मीळ व औषधी गुणधर्मानी युक्त रानभाजी मानली जाते. भरउन्हाळ्यात आदिवासी बांधवांसाठी ही भाजी जणू वरदानच ठरते. सध्या या झाडांना आलेल्या हिरव्यागार पानांमुळे आणि मोहरामुळे परिसरात भोकरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता दिसून येत आहे.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध रानभाजीभोकरच्या पानांपासून तयार होणारी भाजी शरीराला थंडावा देणारी मानली जाते. उष्णतेमुळे होणारे त्रास कमी करण्यास तसेच शरीरातील पित्त नियंत्रित ठेवण्यास ती उपयुक्त असल्याचे स्थानिक सांगतात. पारंपरिक ज्ञानानुसार सांधेदुखी आणि जखमांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो. त्यामुळे भोकरला स्थानिक पातळीवर औषधी रानभाजी म्हणून विशेष महत्त्व आहे.

भोकर रानभाजी रेसिपी :साहित्य : कोवळी भोकर पाने/फळे (स्वच्छ धुऊन चिरलेली), कांदा, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट, मोहरी, हळद, तेल आणि मीठ.कृती :

  • कढईत तेल गरम करून मोहरी, लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या.
  • बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
  • स्वच्छ चिरलेली भोकर पाने/फळे घालून मंद आचेवर वाफ काढा.
  • पाने शिजल्यावर चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून ५-७ मिनिटे परता.
  • गरम भोकर रानभाजी तयार 

 

Mango Pickle : लोणचं बनवायचं, अशा पद्धतीने बनवा दोन वर्ष टिकणारं गावरान पद्धतीचं लोणचं, वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhokar vegetable cools body in summer: Where to find, recipe.

Web Summary : Bhokar, a medicinal wild vegetable, thrives in Satpura, sold for ₹150-200/kg. It cools the body, controls bile, and helps with joint pain. Recipe includes Bhokar leaves/fruits, onion, garlic, and peanut powder.
टॅग्स :शेती क्षेत्रपाककृतीभाज्याशेती