नाशिक : यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कांदा बियाणे शेतातच सडली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंदरसुल येथील शेतकरी येथील जनार्दन पागिरे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर बीट कंदमुळे पीक घेतले आहे.
साधारणपणे जानेवारी महिन्यात लागवड केलेले हे पीक आता विक्रीसाठी चालू असून साधारणपणे बाराशे ते चौदाशे रुपये क्विंटलप्रमाणे त्याची विक्री सुरू आहे, पण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळत असल्याने आणि कमी कष्टात बीट हे पीक घेतले गेल्याने शेतकऱ्याला खर्चवजा साधारणपणे एक ते सव्वा लाख रुपये ६० ते ६५ दिवसात निव्वळ नफा राहणार आहे.
बीट हे थंड हवामानातील पौष्टिक आणि फायदेशीर पीक आहे. साधारण ६०-७० दिवसांत तयार होणाऱ्या पिकासाठी योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य बियाणे वापरल्यास हेक्टरी २० टन उत्पादन मिळू शकते. हे थंड हवामानातील पीक असल्याने या काळात मुळांची वाढ, रंग आणि चव चांगली मिळते.
एक एकरासाठी लागणारा खर्च
- बियाणे - ६ हजार रुपये
- पेरणी - २५०० रुपये
- लिक्चिड खते - १५०० रुपये
- निंदणी - ३ हजार रुपये
आपल्याकडे कांदा हे मुख्य पीक आहे. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा रोप खराब झाले. कांद्याला फाटा देत एक एकर बिट पेरले. ६० दिवसाच्या कालावधीत पीक काढणीला आले. - जनार्दन पागिरे, शेतकरी, अंदरसूल
Web Summary : Nashik farmer Janardan Pagire bypassed onion crop failure by cultivating beetroot on one acre. He earned over a lakh in 65 days due to low costs, good yields, and selling beets at ₹1200-1400 per quintal. Proper water management yields 20 tons per hectare.
Web Summary : नासिक के किसान जनार्दन पागिरे ने प्याज की फसल विफल होने के बाद एक एकड़ में चुकंदर की खेती की। कम लागत, अच्छी उपज और ₹1200-1400 प्रति क्विंटल पर चुकंदर बेचकर उन्होंने 65 दिनों में एक लाख से अधिक कमाए। उचित जल प्रबंधन से 20 टन प्रति हेक्टेयर उपज होती है।