जळगाव : भारतीय बीज समिती सहकारी लिमिटेडच्या वतीने (बीबीएसएसएल) हिंगोणे (यावल) येथील २० हेक्टर परिसरात बनाना टिश्यू कल्चर प्लांटलेट उत्पादन केंद्र (ऊतक संवर्धनाच्या तंत्रातून रोपांची निर्मिती) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या राष्ट्रीयस्तरावरच्या माध्यमातून रोगमुक्त, उच्च प्रतीचे केळी रोपांची निर्मिती होणार आहे.
गेल्या महिन्यात भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जोशी, डॉ. जयप्रकाश तम्मीनाना व जिल्हा प्रकल्प व कार्यक्रम निरीक्षण विभागाचे समन्वयक अमोल जुमडे यांनी वल आणि मुक्ताईनगरमधील जागांची पाहणी केली होती. त्यानंतर हिंगोण्यातील जागेवर शिक्कामोर्तब करीत तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला.
असे होणार फायदे
- दरवर्षी ६० लाख उच्च दर्जाचे, रोगमुक्त, जास्त उत्पादन देणारे केळी रोपांची उत्पादन क्षमता.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, रोगप्रसारात घट व पिकाची एकसमान गुणवत्ता.
- ग्रामीण युवकांसाठी जैवतंत्रज्ञान व नर्सरी व्यवस्थापन क्षेत्रात रोजगार निर्मिती.
- 'जळगाव केळी' जीआय-टॅग असलेल्या उत्पादनाची निर्यात क्षमता वाढ.
- सहकाराच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार.
हा प्रकल्प जिल्ह्यासाठीच नव्हेतर राज्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातून केळी उत्पन्नात वाढ, रोगप्रसारात घट, आणि पिकाची एकसंध गुणवत्ता जोपासली जाणार आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
Kanda Market : मागील सहा दिवसांत कांदा आवक किती झाली, काय दर मिळाले?