Join us

Banana Farming : टिश्यूकल्चरवरील लागवड, शेणखताचा वापर, भडगावच्या शेतकऱ्याच्या केळीची इराणला निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:09 IST

Banana Farming : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतातील केळी इराणला निर्यात झाली आहे.

जळगाव : केळीच्या पिकासाठी शेतकरी (Banana Farmer) चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत. एकीकडे स्थानिक बाजारपेठात मिळणारा बाजारभाव, दुसरीकडे इतर देशातून वाढत असलेली मागणी यामुळे केळीच्या लागवडीवर शेतकरी भर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना  केळी पिकातून मिळत असल्याचे चित्र आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतातील केळी इराणला निर्यात झाली आहे. केळीचे एकरी उत्पन्न अव्वल ठरले आहे. सरासरी ३५ ची रास पडली असून, केळीला प्रति क्विंटल १७५१ रुपयांचा भाव मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकवली जातात. सद्यस्थितीत काही भागात लागवड (Banana Cultivation) सुरु असून काही ठिकाणी काढणी सुरु आहे. शेतकरी पाटील यांच्या केळी बागेची काढणी सुरु असून त्यांनी टिश्यूकल्चरवर केळीची लागवड केली होती. सद्यस्थितीत त्यांच्याकडे काढणी सुरु असल्याने या केळीला चांगली मागणी आहे. पाटील यांच्या शेतातून केळी थेट इराणला रवाना झाली आहेत. यात त्यांनी टिश्यूकल्चरवर केलेल्या लागवडीमुळे चांगला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

पाटील हे शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेतीतून ते विक्रमी उत्पादन घेतात. सद्यःस्थितीत त्यांनी सहा एकर शेतीत ९ हजार टिश्यूकल्चरच्या केळीच्या रोपांची लागवड केली होती. त्यांची ती केळी इराण देशात निर्यात झाली आहे. साधारणपणे एका केळीच्या झाडाला २० ते २५ किलोचा घड येतो. मात्र पाटील यांच्या शेतातील घडाचे वजन हे ३२ ते ३५ किलोच्या दरम्यान आहे. मात्र त्यांनी सातत्याने ही किमया साधली आहे. कजगाव येथील केळीचे व्यापारी राहुल पाटील यांच्या माध्यमातून ती इराणला रवाना झाली आहे. साधारणे केळीला १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव असतो. पण या केळीला १७५१ रुपयाचा भाव मिळाल्याचे त्यांनी यावेळी बोलतान सांगितले.

शेणखतावर भरराजेंद्र पाटील हे शेतीत रासायनिक खतांपेक्षा शेणखतांवर अधिक भर देतात. त्यामुळे आपण विक्रमी उत्पादन काढू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. खतांच व अंतर्गत मशागतीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे केळीचे विक्रमी उत्पन्न घेणे शक्य होते. ज्या शेतात केळीची लागवड करायची आहे, ते शेतलागवडीच्या आधी चार महिने पडीक ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतीजळगावइराण