Join us

Bamboo Cultivation : अनुदान भरपूर, लागवड थोडी; बांबू योजनेला प्रतिसाद का नाही? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:25 IST

Bamboo Cultivation : शेतीत नवीन संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड म्हणजे सोन्याची संधी होती. सरकार चार वर्षांत तब्बल सात लाख रुपये अनुदान देतंय, रोजगारही मिळतोय. तरीही हिंगोली जिल्ह्यात शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. पडीक जमीन, कमी देखभाल आणि मोठं उत्पादन असतानाही केवळ ५५ हेक्टरवरच लागवड झाली आहे. (Bamboo Cultivation)

Bamboo Cultivation : शेतीत नवीन संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड म्हणजे सोन्याची संधी होती. सरकार चार वर्षांत तब्बल सात लाख रुपये अनुदान देतंय, रोजगारही मिळतोय. (Bamboo Cultivation)

तरीही हिंगोली जिल्ह्यात शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. पडीक जमीन, कमी देखभाल आणि मोठं उत्पादन असतानाही केवळ ५५ हेक्टरवरच लागवड झाली आहे. (Bamboo Cultivation)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) (MANREGA) जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बांबू लागवड योजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Bamboo Cultivation)

चार वर्षांत ७ लाख ४ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असतानाही आतापर्यंत केवळ ५५.८ हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली आहे.(Bamboo Cultivation)

बांबू – बहुपयोगी आणि नफा देणारे पीक

बांबू हे कमी देखभाल लागणारे, जलसंधारणास अनुकूल आणि पर्यावरण पूरक पीक आहे. तीन ते चार वर्षांत बांबू कापणीसाठी तयार होतो आणि एकदा लागवड केल्यावर अनेक वर्षे उत्पादन देतो. बांबूचा उपयोग फर्निचर, हस्तकला, कागद, बांधकाम, इथेनॉल निर्मिती यासाठी होतो, त्यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होतात.

अनुदान भरपूर, पण प्रतिसाद कमी

मनरेगा योजनेंतर्गत चार वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्याला एकूण ७ लाख ४ हजारपर्यंतचे अनुदान दिले जाते. यात खड्डे खोदणे, रोपे लावणे, सिंचन व देखभाल यांसारख्या कामांना रोजगारही मिळतो. तथापि, या योजनेबाबत जागरुकतेचा अभाव, शंका आणि गोंधळामुळे शेतकरी मागे हटत आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष लागवड (हेक्टरमध्ये)

तालुकाउद्दिष्ट (हे.)प्रत्यक्ष लागवड (हे.)
हिंगोली८०००
वसमत८०१०.८
कळमनुरी८०४५
औंढा नागनाथ८०००
सेनगाव८०००
एकूण४००५५.८

....तरीही अनुत्साह का?

* जमिनीची सुपिकता वाढते; मुळे मृदगर्भ धूप थांबवतात

* पर्यावरण पूरक; अधिक ऑक्सिजन आणि कार्बन शोषण

* रोजगार निर्मिती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

* कमी देखभाल; कमी पाणी आणि खतांची गरज

तरीही शेतकरी योजनेकडे शंका आणि अनभिज्ञतेमुळे पाठ फिरवत आहेत. पडीक जमिनीचा उपयोग करून दीर्घकालीन उत्पन्न साधता येणार असतानाही, मनरेगा योजनेचा हेतू अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Bamboo Sheti : कमी जागेत, मोठा नफा; बांबू पिकाने दिला नवा मार्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबांबू गार्डनशेतकरीशेतीकृषी योजनासरकारी योजना