Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारेच्या कुंपणाला लाखोंचा खर्च टाळा, करवंदाची शेती करा, शेतीला कुंपण पण आणि उत्पन्न पण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:35 IST

Karvand Sheti : फळबागेला कुंपण करायचा विचार करत असल्यास तारेच्या कुंपणासाठी खूप खर्च येतो.

Karvand Sheti :    आपण आपल्या शेतीला, फळबागेला कुंपण करायचा विचार करत असल्यास तारेच्या कुंपणासाठी खूप खर्च येतो. त्याऐवजी आपण करवंदाचे जैविक कुंपण शेतीला केले तर चांगला फायदा होतो. 

करवंद शेती (Karonda Farming) हा कमी खर्चात, कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही चांगला नफा देणारा दुहेरी फायद्याचा व्यवसाय आहे. शेताच्या बांधावर करवंदाची लागवड केल्यास, काटेरी झुडूप असल्याने जनावरांपासून पिकांचे नैसर्गिक संरक्षण होते. या झाडाची पाने दाट असल्याने हवाही रोखली जाते. आणि जमिनीची धूप होण्यापासून बचाव होतो आणि उन्हाळ्यात फळांची विक्री करून चांगली कमाई करता येते. 

करवंद शेतीचे दुहेरी फायदे : करवंदाची लागवड करताना उत्तम निचरा होणारी, मुरमाड किंवा हलकी जमीन निवडावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करणे योग्य ठरते. 

नैसर्गिक कुंपण (Protection): करवंद हे अत्यंत काटेरी झुडूप आहे. शेताच्या चारी बाजूंना हे लावल्यास वन्य प्राणी (डुक्कर, हरीण) आणि जनावरांपासून मुख्य पिकाचे संरक्षण होते, ज्यामुळे कुंपणाचा खर्च वाचतो.आर्थिक उत्पन्न (Profit) : करवंदाला शहरात व प्रक्रिया उद्योगात मोठी मागणी आहे. कोकण करवंद (बोल्ड) सारख्या उन्नत जातींची लागवड करून कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार उत्तम व्यवस्थापन केल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.कमी निविष्ठा व खर्च : हे पीक दुष्काळसदृश परिस्थितीतही तग धरते. पाणी कमी लागते आणि खते-कीटकनाशकांचा खर्चही नगण्य असतो.आरोग्यदायी आणि प्रक्रियायुक्त फळ: करवंदात व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यापासून जेली, जॅम, सरबत, सरबत आणि लोणचे बनवून वर्षभर विक्री करता येते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Skip Fence Costs: Grow Karonda for Farm Protection and Profit!

Web Summary : Ditch expensive fences! Karonda farming offers natural protection from animals, prevents erosion, and provides income through fruit sales. It requires minimal water and investment, yielding healthy produce for various products.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनशेतकरी