Join us

Ashadhi Ekadashi Special : आषाढी एकादशी स्पेशल! साबुदाणा आप्पे बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 12:13 IST

Ashadhi Ekadashi Special : उपवास म्हटलं की, नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा वडे… यावेळी थोडा बदल करून कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा आप्पे करून पाहा. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी उपवासात नवा स्वाद घेऊन येईल. (Ashadhi Ekadashi Special)

Ashadhi Ekadashi Special :  आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासासाठी काहीतरी वेगळं, पौष्टिक आणि चविष्ट खावं, असं वाटतं ना? मग नक्की करून पाहा हे झणझणीत आणि कुरकुरीत साबुदाणा आप्पे. (Ashadhi Ekadashi Special)

उपवास म्हटलं की, नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा वडे… यावेळी थोडा बदल करून कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक साबुदाणा आप्पे करून पाहा. घरच्या घरी सहज तयार होणारी ही पध्दत उपवासात नवा स्वाद घेऊन येईल.(Ashadhi Ekadashi Special)

साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा स्वाद आणि राजगिऱ्याच्या पिठाची चव उपवासाला योग्य आणि पोटाला सुखावणारं हे पारंपरिक पक्वान्न आहे.(Ashadhi Ekadashi Special)

साहित्य (२ ते ३ जणांसाठी) 

३/४ कप साबुदाणा (रात्री भिजवलेला)

१/२ कप उकडलेला बटाटा (मसाला कुस्करून)

२ टेबलस्पून राजगिरा पीठ

१/२ कप शेंगदाणे कूट

१/२ टीस्पून किसलेलं आलं

३–४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या/पेस्ट)

१ टीस्पून जीरे

१ टीस्पून साखर

१/२ टीस्पून लिंबाचा रस

१ टीस्पून मीठ (सेंधा मीठ/साधं उपवासासाठी)

३/४ टेबलस्पून तेल

कृती :

साबुदाणा भिजवा : साबुदाणा रात्री भिजत घाला. १० मिनिटं पाण्यात राहू द्या आणि मग जास्तीचं पाणी काढून टाका. साबुदाणा किंचित ओलसर राहू द्या.

मिश्रण तयार करा : एका मोठ्या परातीत उकडलेला बटाटा, भिजलेला साबुदाणा, शेंगदाणे कूट, राजगिरा पीठ एकत्र घ्या. त्यात मीठ, साखर, लिंबाचा रस, आलं, मिरची घालून सर्व मिश्रण छान मळून घ्या.

गोळे बनवा : छोट्या आकाराचे गोळे करून ठेवा.

आप्पे भाजा : आप्पेपात्र मध्यम आचेवर गरम करा. आप्पेपात्राला थोडं तेल लावून तयार गोळे त्यात ठेवा. झाकण ठेवून ५–७ मिनिटं शिजू द्या. नंतर उलट करून दुसऱ्या बाजूनेही खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.

सजावट : तयार साबुदाणा आप्पे दही किंवा नारळाची चटणी सोबत सर्व्ह करा. गरमागरम कुरकुरीत आप्प्यांचा स्वाद घ्या आणि उपवासाला खास बनवा.

टीप :* राजगिऱ्याऐवजी वरई पीठही वापरू शकता.* मिरच्यांचा तिखटपणा आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.* हे आप्पे लहान-मोठ्यांना आवडतील आणि पोटालाही हलके राहतील.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआषाढी एकादशी २०२५