Join us

PM Kisan Update : पीएम किसान योजनेत अर्ज करताय, पहिल्यांदा 'हे' काम करा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:37 IST

PM Kisan Update : आता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) नवीन अर्जदारांसाठी 'ही' नोंदणी अनिवार्य केली आहे.

PM Kisan Update :   देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनांचा (Farmer Scheme) लाभ मिळवून देण्यासाठी सर्व राज्यांमध्ये शेतकरी नोंदणी केली जात आहे, जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची माहिती मिळेल. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) नवीन अर्जदारांसाठी शेतकरी नोंदणी अनिवार्य केली आहे.

देशात कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. पूर्वी, योजनेचे फायदे मिळविण्यासाठी ई-केवायसी (e kyc) पुरेसे होते. आता शेतकऱ्यांना यासाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक ओळखपत्र (Farmer ID) मिळेल.

तथापि, जुन्या शेतकऱ्यांना यासाठी वेळ दिला जात आहे. परंतु नवीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी मंत्रालयाने पीएम किसानसह इतर कृषी योजनांसाठी शेतकरी नोंदणी अनिवार्य केली आहे आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.

शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सहज मिळेलकृषी मंत्रालयाच्या मते, पीएम किसान हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, नवीन अर्जदारांना कृषी जमिनीच्या नोंदींशी जोडलेला डिजिटल आयडी असणे अनिवार्य आहे. ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदणीकृत आहे, त्यांनाच या योजनेचे फायदे मिळावेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. नोंदणी प्रक्रिया सोपी करण्यासाठी शेतीशी संबंधित इतर योजनांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

'युनिक आयडी' मुळे प्रक्रिया सोपी १ जानेवारी २०२५ पासून, राज्यांनी जमिनीच्या नोंदींचे ओळखपत्र तयार आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची माहिती सहज उपलब्ध होईल. डीबीटी अंतर्गत विद्यमान लाभार्थ्यांची शेतकरी नोंदणी तयार करण्याची प्रक्रिया सुरूच राहील. शेतकऱ्याला दिलेला हा युनिक आयडी अर्जदाराकडे शेतीयोग्य जमीन असल्याची हमी देईल आणि यामुळे पीएम-किसानसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल.

'राज्यांनी भूमी अभिलेख प्रणाली सुधारावी'कृषी मंत्रालयाने राज्यांना त्यांच्या भूमी अभिलेख प्रणालीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. जेणेकरून अर्जदाराचे नाव, लगेचच जमीन मालकांच्या कॉलममध्ये येईल. शेतकऱ्यांसाठी एक युनिक आयडी तयार केल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीची, शेतात लावलेल्या पिकांची आणि इतर तपशीलांची माहिती मिळणे सोपे होईल आणि सरकारला डीबीटी, कर्ज मंजुरी, पीक विम्याद्वारे पैसे पाठवणे सोपे होईल. आणि पीक उत्पन्नाचा आगाऊ अंदाज लावला जाईल.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेती क्षेत्रशेती