Join us

Anudan Vatap Ghotala : शेतकरी अनुदान घोटळा प्रकरण; घोटाळेबाजांवर कारवाईचा 'सिलसिला' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:21 IST

Anudan Vatap Ghotala : जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान लाटण्याचा मोठा प्रकार उघड झाला आहे. बनावट शेतकरी दाखवून आणि जमीन नसतानाही सरकारी मदतीचा गैरवापर करण्यात आला. या प्रकारात महसूल विभागातील तलाठी, सहायक कर्मचारी, तसेच वरिष्ठ अधिकारीही अडकल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींनी उघडकीस आलेला हा प्रकार संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. वाचा सविस्तर (Anudan Vatap Ghotala)

Anudan Vatap Ghotala :जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान लाटण्याचा मोठा प्रकार उघड झाला आहे. बनावट शेतकरी दाखवून आणि जमीन नसतानाही सरकारी मदतीचा गैरवापर करण्यात आला. (Anudan Vatap Ghotala)

या प्रकारात महसूल विभागातील तलाठी, सहायक कर्मचारी, तसेच वरिष्ठ अधिकारीही अडकल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत २२ अधिकारी-कर्मचारी निलंबित करण्यात आले असून, ३५ जणांवर विभागीय चौकशी सुरू आहे. (Anudan Vatap Ghotala)

अनेक तहसीलदार आणि नायब तहसीलदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, पुढील टप्प्यात फौजदारी गुन्ह्यांची नोंद होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींनी उघडकीस आलेला हा प्रकार संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.(Anudan Vatap Ghotala)

राज्यातील कृषी अनुदानाच्या वितरणात मोठा अपहार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ दरम्यान अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या अनुदानात सुमारे ४२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत २२ महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

याशिवाय ३५ तलाठ्यांवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, भविष्यात त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

घोटाळ्याचे स्वरूप काय?

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनेक गंभीर तथ्ये उघडकीस आले आहे.

जमीन नसलेल्या किंवा बनावट नावाने शेतकरी दाखवले गेले

एकाच नावावर दोनदा अनुदान मंजूर

बनावट अर्ज व कागदपत्रांचा वापर

साखळी स्वरूपात महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश

या प्रकारामुळे सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला असून, पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहिला.

निलंबनाची कारवाई – संख्या आणि कर्मचारी

मागील आठवड्यात : १० तलाठी निलंबित

गुरुवारी पुन्हा : ७ तलाठी व ४ सहायक महसूल अधिकारी निलंबित

एकूण निलंबन संख्या : २२ कर्मचारी

विभागीय चौकशीसाठी शिफारस : ३५ तलाठी

कारवाईचा अहवाल शासनाकडे : ५ तहसीलदार व ६ नायब तहसीलदारांविरोधात

निलंबित कर्मचाऱ्यांची नावे (गुरुवार दिनांक २० जून रोजी)

तलाठी डी. जी. कुरेवाड - सो. पिंपळगाव

तलाठी सचिन बागूल – डोमगाव

तलाठी राजू शेख – तीर्थपुरी

तलाठी एस. एस. कुलकर्णी – बाजी उम्रद

तलाठी एस. एम. जारवाल – बोधलापुरी

तलाठी डी. जी. चांदमारे – मूर्ती

मंडळ अधिकारी ज्योती खर्जुले – कुंभाझरी

सहा. महसूल अधिकारी आर. बी. माळी – मंठा तहसील

सहा. महसूल अधिकारी आशिष पैठणकर – घनसावंगी

सहा. महसूल अधिकारी सुशील जाधव – अंबड

सहा. महसूल अधिकारी व्ही. डी. ससाने – घनसावंगी

प्रशासनाचे काय असेल पुढचे पाऊल

दोषी अधिकाऱ्यांचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर

विभागीय चौकशीनंतर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या

जिल्हा परिषदेकडून ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांवर अद्याप कारवाई सुरू नाही

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, "घोटाळ्यात सहभागी कोणताही कर्मचारी वा अधिकारी वाचणार नाही. यामध्ये पूर्ण पारदर्शकता आणि कठोर कारवाई होईल.

लाचखोर यंत्रणेवर लगाम घाला

या प्रकरणामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, दोषींवर कठोर शिक्षा व्हावी आणि लाचखोर यंत्रणेवर लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.

घोटाळ्याचा तपशील 

घटकतपशील
घोटाळा कालावधी२०२२ – २०२४
अंदाजे रक्कम४२ कोटी रुपये
आतापर्यंत निलंबित२२ कर्मचारी
चौकशीसाठी शिफारस३५ तलाठी
संभाव्य गुन्हेफौजदारी गुन्ह्यांची शक्यता
अहवाल सादर५ तहसीलदार, ६ नायब तहसीलदारांविरुद्ध

हे ही वाचा सविस्तर : Anudan Vatap Ghotala : शासनाची कडक भूमिका: अनुदान लुट प्रकरणी वरिष्ठ अधिकारी रडारवर! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारी योजनाकृषी योजनाजालना