All Spice Tree : दररोजच्या जेवणात मसाल्याचा वापर (Masale) केला जातो. त्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येत असते. यात वेगवेगळ्या मसाल्यांचा समावेश असतो. हेच मसाले जर एकाच झाडाच्या पानांत असतील तर? ऑलस्पाईस (All Spice Tree) या झाडात सर्व मसाल्यांची चव सामावलेली आहे. शिवाय गुणकारी औषध म्हणूनही या झाडाची ओळख आहे. जाणून घेऊया ऑलस्पाईस या झाडाबद्दल....
विशेषतः कर्नाटक (Karnatka) आणि केरळमधील काही भागात ऑलस्पाइस ही वनस्पती आढळते. या झाडाची पाने अशी पसरट असतात. ही पाने तोडून वास घेतल्यास चार मसाल्यांचा एकत्रित सुगंध येतो. आता आपण स्वयंपाक करताना लवंग, वेलची, तेजपान किंवा तमालपत्र, दगडफूल, दालचिनी असे वेगवेगळे मसाले वापरतो. अशा सगळ्या मसाल्यांचां स्वाद या ऑल स्पाईसच्या पानातून मिळत असतो.
आणि म्हणूनच विविध मसाल्यांचाां नैसर्गिक सुगंध देणारे रोप म्हणून ऑलस्पाइस या झाडाला ओळखलं जातं. ऑल स्पाईस हे रोप घरात किंवा परसबागेत लावण्याच्या झाडांमध्ये सध्या खूप लोकप्रिय आहे. पण केवळ स्वादासाठी म्हणून नव्हे तर यातील औषधी गुणांसाठी हे रोप जवळपास लावायलाच हवं असं आहे. विशेष म्हणजे या पानात मसाल्यांचा वासच नाही तर औषधी गुणधर्मामुळे सर्दी, ताप यासारख्या आजारांवर देखील उपयुक्त ठरते.
झाडाची वैशिष्ट्ये
ऑल स्पाईस वनस्पतीला फुले किंवा फळे नसतात, फक्त पाने असतात. याची पाने लवंगासारखी दिसतात, पण थोडी रुंद व अंडाकृती असतात. पाने जाड व चमकदार असतात. यात जायफळ, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी यांचा समावेश आहे. या फीचरमुळे याला ‘ऑल स्पाइस’ असे नाव देण्यात आले आहे. हे झाड औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते आणि त्याच्या पानांचा उपयोग अनेक आजारांच्या उपचारात केला जातो.
पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...