Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अक्कलकरा' फायदेशीर शेती, पाने, फुले आणि मुळ्यांचीही विक्री, तीन महिन्यांत उत्पन्न सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:35 IST

Akarkara Farming : शिंदी येथील प्रयोगशील शेतकरी सतिश शिवदास पाटील यांनी 'अक्कलकरा' या औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. 

- प्रमोद पाटील जळगाव : सध्याच्या अनिश्चित हवामानात पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, भडगाव तालुक्यातील शिंदी येथील प्रयोगशील शेतकरी सतिश शिवदास पाटील यांनी 'अक्कलकरा' या औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. 

आपल्या २० गुंठे क्षेत्रात या शेतकऱ्याने मध्य प्रदेशातील निमच मंडी येथून बियाणे आणून १५ जानेवारी रोजी अक्कलकराची लागवड केली. अवघ्या तीन महिन्यांत या पिकाचे उत्पादन सुरू झाले आहे. या वनस्पतीची पाने, फुले आणि मुळे या सर्वांना बाजारपेठेत मोठी मागणी असून चांगले उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठळक वैशिष्ट्ये : अवघ्या ३ महिन्यांत उत्पादन सुरू, पाने, फुले आणि मुळ्यांची विक्री शक्य. - औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत चांगला भाव.

कृषी अधिकाऱ्यांकडून कौतुकजिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी आणि उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे यांनी या क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्य या प्रयोगाचे कौतुक केले. याप्रसंगी फरकांडे येथील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रविण पाटील, एरंडोलचे उप कृषी अधिकारीकिशोर साळुंखे, प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते. नोकरीनिमित्त निमच परिसरात असलेल्या भावाच्या प्रोत्साहनामुळे हा प्रयोग केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

नेहमीच आपण पारंपारिक शेती करीत असतो. मात्र वाढते दर यामुळे शेतकरीशेती न करता उक्त्याने देतात. यासाठी बाजाराचा अभ्यास करावा. पारंपरिक पिकांऐवजी बाजारमूल्य पाहून पीक पद्धतीत बदल केल्यास शेती नक्कीच परवडते,"- सतीश पाटील,, शेतकरी, शिंदी

 

 

 विहिरीत सापडली चौदाव्या शतकातील गधेगळ, गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासात काय महत्व?

English
हिंदी सारांश
Web Title : Profitable 'Akkalkara' Farming: Leaves, Flowers & Roots Sold; Income in 3 Months

Web Summary : Farmer Satish Patil in Bhadgaon cultivates 'Akkalkara,' a medicinal plant, yielding income in three months. He sells leaves, flowers, and roots, praised by agriculture officials for this innovative approach to farming.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीशेतकरी यशोगाथा