Join us

Ai in Agriculture : Ai शेती विकसित कारण्यासाठी निधीत वाढ करणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:28 IST

Ai in Agriculture : कृषी क्षेत्रासाठी चांगल्या कामाला निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासनउपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले. 

Ai in Agriculture : येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्र हा भारतातील कृषी क्षेत्रामध्ये  (Ai in Agriculture) आणि निर्यातीमध्ये अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रासाठी चांगल्या कामाला निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले. 

कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "दिशा कृषी उन्नतीची 2019" या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यामध्ये अंजीर, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, केळी व आंबा या पिकांचे क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात येणार असून निर्यातीतही वाढ करण्यात येणार आहे. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या कृषी क्षेत्रामध्ये हे आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने यंदा 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जर येणाऱ्या काही दिवसात तंत्रज्ञान विस्तारासाठी अजून निधीची गरज लागली तर राज्य सरकार जास्तीचा निधी उपलब्ध करून देणार आहे. 

पुण्यात पहिल्यांदाच ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून शेतीमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, iOT आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे, पाण्याची बचत होणार आहे. ऊस पिकासाठी राज्यातील एकूण प्राण्यांपैकी 70 टक्के पाण्याचा वापर होतो पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे आता पाण्याची बचत होणार असून इतर पिकांसाठी ते पाणी उपलब्ध होईल असंही पवार म्हणाले.

...आम्हाला लावला चुना!आम्ही मागे एक रुपयात पिक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली होती. पण गावरान भाषेत सांगायचं झालं तर या योजनेतून शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला असं वक्तव्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीअजित पवार