Join us
Daily Top 2Weekly Top 5

कष्ट करण्याची तयारी असेल तरच शेती करायची अन्यथा.... शेतकऱ्यांवर कोणतं संकट ओढवलंय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:35 IST

Agriculture News : अवकाळी येणारा पाऊस, रोगांचा प्रार्दुभाव, बियाण्यांमधील फसवणूक आणि न मिळणारा बाजारभाव..

Agriculture News : अलिकडच्या काळात शेती करणे हे अवघड होऊन बसलं आहे. अवकाळी येणारा पाऊस, कधीकधी रोगांचा प्रार्दुभाव, बियाण्यांमध्ये होणारी फसवणूक आणि सगळं व्यवस्थित झालं तर वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतातच माल पडून राहणे, अशा असंख्य अडचणी सोसत शेतकरी त्याचा माल बाजारपेठेपर्यंत आणतो. 

शेतात मजूर मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करणारी चर्चा करत एका चौकात दोन तरूण बसले होते. त्यातील पहिला म्हणाला, अरे, मजुरांची खूपच समस्या निर्माण झालेय. मजूर मिळत नाही तर आम्हालाही आता सकाळीच उठून शेतात जावं लागतं. दुपारी चार घास पोटात ढकलायचे आणि भर उन्हात पुन्हा कामाला सुरूवात करायची. शेतात जाउन कसा घाम गाळावा लागतो आणि शेतकरी हे सगळं कसं करत असेल?

याचा अनुभव मी घेतोय. खरंच खूप कष्ट करावे लागतात शेतात, त्याशिवाय पिकत नाही धान्य. त्यावर दुसरा म्हणाला, अरे हो ना. कष्टाशिवाय काही खरं नाही या जगात. कष्ट करण्याची तयारी असेल तरच शेती करायची अन्यथा.. आणि आता मजूर मिळत नाही. मिळाला मजूर तर त्याची मजुरी न परवडणारी. त्यावर पहिला म्हणाला, अरे, मला असं वाटतं, शेती करून तो जुगार करण्यापेक्षा मजूर बनणंच चांगलं. 

नोकरीतील नोकरदारासारखा पगार तरी हातात मिळतो. बरं. मजूर मिळत नसल्याने पूर्वसारखं टाकून बोलणंही होत नाही. मानसन्मानाची वागणूक मिळते. हवी तेव्हा सुट्टी घ्यायची, हवे तेव्हा कामावर जायचे. त्यावर दुसरा तरूण टाळी देत म्हणाला, मनाला पटत नसलं तरी तू बोलतोस ते खरंच आहे यार!

 

 दहावीचा निकाल जाहीर, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!

 

English
हिंदी सारांश
Web Title : Farming tough without labor; farmers face challenges, consider other options.

Web Summary : Farmers struggle with unpredictable weather, unreliable seeds, and labor shortages. Two young men discuss the hardships, with one suggesting labor work is better than farming due to guaranteed wages and respect.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना