Join us

Agriculture Schemes : रब्बी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रात्यक्षिक; आजच नोंदणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:55 IST

Agriculture Schemes : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी शेतकरी गट, FPO आणि सहकारी संस्थांना मोठी संधी मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच खाद्यतेल अभियानांतर्गत गहू, कडधान्य, सूर्यफूल, ऊस, करडई, मोहरी यांसारख्या पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. (Rabi crops)

Agriculture Schemes : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ साठी विविध पिकांचे प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. (Rabi crops)  

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.(Rabi crops)  

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर निवड होणार असल्याने लवकर अर्ज करा आणि तुमच्या गटाला उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवा.(Rabi crops)  

पात्रता व अटी

अर्ज करणाऱ्या शेतकरी गटांची नोंदणी ३१ मार्च २०२४ पूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे झालेली असावी.

गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याकडून अर्ज सादर केला जाईल.

अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या सदस्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होईल.

प्रात्यक्षिकांसाठी उपलब्ध पिके

गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी, सूर्यफूल या पिकांमध्ये उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

अर्ज प्रक्रिया

गटाच्या प्राधिकृत सदस्यांनी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLoginया संकेतस्थळाला भेट द्यावी.

बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे व खते या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करावा.

अर्जाची सुविधा २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, उपलब्ध कोट्यापर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

आवश्यक कागदपत्रांची यादी

गट / संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र

३१ मार्च २०२४ पूर्वी शासकीय यंत्रणेकडे नोंदणी झाल्याचा दाखला.

प्राधिकृत सदस्याचे अधिकृत पत्र (Authorization Letter)

गटाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे नाव व स्वाक्षरी असलेले पत्र.

फार्मर आयडी (प्राधिकृत सदस्य व अर्जातील लाभार्थींसाठी).

आधार कार्ड / ओळखपत्र

बँक पासबुकची छायाप्रत – खात्याचा तपशील स्पष्ट असावा.

गटाचा ठराव / मिनिट्स – प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचा निर्णय नोंदलेला.

सदस्यांची यादी – नावे, मोबाइल क्रमांक, फार्मर आयडी यासह.

संबंधित शेतीची ७/१२ उतारा (सातबारा) किंवा ८-अ उतारा – पिकांची नोंद असलेली.

पिकांच्या प्रात्यक्षिकासाठी प्रस्तावित क्षेत्राची माहिती – सर्वे क्रमांक, हेक्टर, पिकाचे नाव.

पॅन कार्ड (असल्यास).

हे ही वाचा सविस्तर : Satbara Utara Correction : शेतकऱ्यांना दिलासा: महसूल विभाग गावातच करणार सातबारा दुरुस्ती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनारब्बी हंगामपीकगहूकरडईकेंद्र सरकारशेतकरी