Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटीवर कागदपत्रे सादर करूनही 'अर्ज रद्द'चा मॅसेज येतोय, जाणून घ्या नेमकं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 20:30 IST

Mahadbt Portal : यांत्रिकीकरण अनुदान योजनेतील महा-डीबीटी पोर्टलवरील गोंधळामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे.

अमरावती  : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरण अनुदान योजनेतील महा-डीबीटी पोर्टलवरील गोंधळामुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. कागदपत्रे वेळोवेळी सादर करूनही अर्ज रद्द करण्याची सूचना दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पूर्णानगर येथील अल्पभूधारक शेतकरी उमेश महिंगे यांची पाच एचपीपेक्षा जास्त पॉवर विडर या घटकासाठी महा-डीबीटी पोर्टलवर निवड झाली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यांत तीनवेळा आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व तशी एसएमएसद्वारे पुष्टी मिळूनही पुन्हा सात दिवसांत कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. 

मी गेल्या पाच महिन्यांत तीनवेळा डॉक्युमेंट सादर केले. दोन दिवस आधी ९ जानेवारीपर्यंत पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करा, नाहीतर आपला अर्ज रद्द करण्यात येईल, असा सूचना मॅसेजद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे आता कितीवेळा कागदपत्र अपलोड करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. - उमेश महिंगे, शेतकरी, पूर्णानगर

कृषी विभागाच्या पाहणीनंतरही हुमणी अळीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाचे विदर्भातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई लवकरात लवकर द्या.- श्यामसुंदर ठाकरे, शेतकरी, पूर्णानगर

आतापर्यंत अशी तक्रार कधीच आलेली नव्हती. कदाचित ही पोर्टलवरील तांत्रिक अडचण असेल. लवकरच वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करून अडचण दूर केली जाईल.- उत्कर्षा भोसले, तालुका कृषी अधिकारी, भातकुली

English
हिंदी सारांश
Web Title : Mahadbt: Farmers face 'application cancelled' messages despite document submission.

Web Summary : Farmers are frustrated with Mahadbt portal errors in the mechanization subsidy scheme. Despite submitting documents multiple times, applications are being wrongly cancelled. The agriculture department assures technical issues will be resolved.
टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशेतकरी