Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : अद्रक पिकातील कंदकुज, मुळकुज नियंत्रणासाठी कृषी विभागाची शिवार फेरी, वाचा सविस्तर 

Agriculture News : अद्रक पिकातील कंदकुज, मुळकुज नियंत्रणासाठी कृषी विभागाची शिवार फेरी, वाचा सविस्तर 

Latest News Agriculture News Shiwar feri of Agriculture Department to control Kandaku, Mulkuz in ginger crop, read in detail  | Agriculture News : अद्रक पिकातील कंदकुज, मुळकुज नियंत्रणासाठी कृषी विभागाची शिवार फेरी, वाचा सविस्तर 

Agriculture News : अद्रक पिकातील कंदकुज, मुळकुज नियंत्रणासाठी कृषी विभागाची शिवार फेरी, वाचा सविस्तर 

Agriculture News : यावर्षी त्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मुळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Agriculture News : यावर्षी त्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मुळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Agriculture News : छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातिल खुलताबाद तालुक्यात आद्रक (Adrak Farming) या पिकाची लागवड खरीप हंगामात करण्यात आली होती. मात्र यावर्षी त्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मुळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाजार सांगवी परिसरात 'शिवार फेरी माझा' एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करून शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
  
खुलताबाद तालुक्यात आद्रक या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र यावर्षी त्या पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुज, मुळकुज व मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या उद्भवत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाजार सांगवी, सोबलगाव, सुलतानपूर, भांडेगाव, खांडी पिंपळगाव इत्यादी परिसरात शिवार फेरी केली व त्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन अद्रक पिकाचे पाहणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच  कर्मचारी आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
   
यावेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रभारी डॉ. सूर्यकांत पवार यांनी अद्रक पीक घेताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की 'अद्रक घेताना निचरा जमिनीची निवड केली पाहिजे, जमीन तयार करताना पूर्ण कुजलेले शेणखतच वापरले पाहिजे, आद्रकच्या कंदला योग्य ती बीजप्रक्रिया केली पाहिजे, तसेच तसेच अद्रक पिकात येणारी सड ही कंदमाशी तसेच बुरशीच्या प्रादुर्भावामुळे असू शकते.

कंदमाशीचा वावर दिसल्यास योग्य त्या  कीटकनाशक फवारणी केली पाहिजे. बुरशीमुळे कंद सड होत असल्यास बुरशीनाशकाची आळवणी केली पाहिजे. तसेच सध्या सड लागलेल्या शेतावर यांनी कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या बायोमिक्स या सेंद्रिय घटकाचा वापर करून नुकसान कमी करता येईल.

यावेळी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी के एन इंगळे कृषी पर्यवेक्षक आर के गायकवाड पी व्ही घायत, कृषी सहाय्यक महेश सदावर्ते, संजय सुरसे, गणेश सुरडकर, सचिन सरगर, श्रीकृष्ण नागरे इत्यादी व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Latest News Agriculture News Shiwar feri of Agriculture Department to control Kandaku, Mulkuz in ginger crop, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.