Join us

Agriculture News : पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडा, भूजलपातळी वाढवा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:07 IST

Agriculture News : भूजल साठा (Water Level) वापरण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे, भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे.

Agriculture News : पावसाचे पाणी कुपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका (Kupnalika) पुनर्भरण होय. यामुळे भूजल पातळी वाढते. भूजल साठा वापरण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे, भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्यामुळे, भूजल पातळी वाढवण्यासाठी कूपनलिका पुनर्भरण करणे गरजेचे आहे. नेमकं कूपनलिकेद्वारे पुनर्भरण कसे केले जाते? हे जाणून घेऊयात.... 

कूपनलिकेव्दारे भूजल पुनर्भरण

पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय.

  • कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
  • कुपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मिटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.
  • खडडयातील उंची एवढया केसिंग पाईपच्या भागात एक-दोन सें. मी अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मिमी. व्यासाची छिद्रे पाडावीत.
  • या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.
  • खड्ड्याचे चार भागांत विभाजन करुन सर्वांत खालच्या दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
  • अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होउन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल. कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः ९ हजार रुपये एवढा खर्च येतो.

 

कुपनलिका पुनर्भरणासाठी लागणारे साहित्य :लोखंडी ड्रिल (चार-पाच मिमी.), काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगडगोटे इ.

कुपनलिका पुनर्भरण पध्दत

पहिल्या थरावर २५ सेंमीची थरांची जाडी असेल. यात विटांचे तुकडे (२४ ते २८ मिमी) असे साहित्य व आकारमान असेल. दुसऱ्या थरावर 25 सेंटीमीटर थरांची जाडी तर बारीक वाळू 0.6 ते 2 मिलिमीटर इतकी असावी. त्यानंतर तिसऱ्या थरावर 25 सेंटीमीटर ची थरांची जाडी आणि यात खडी 9.5 ते 15.5 मिलिमीटर इतकी असावी. तर चौथ्या स्तरावर स्तरावर 25 सेंटीमीटर इतकी थरांची जाडी तर साहित्य दगड गोटे हे 20 ते 24 मिलीमीटर इतके असावे. 

- कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीपाणी