Lokmat Agro >शेतशिवार > Insecticide Suit : आता फवारणी करतांना नो टेन्शन, आला भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट

Insecticide Suit : आता फवारणी करतांना नो टेन्शन, आला भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट

Latest news Agriculture News Now no tension while spraying, India's indigenous insecticide suit has launch | Insecticide Suit : आता फवारणी करतांना नो टेन्शन, आला भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट

Insecticide Suit : आता फवारणी करतांना नो टेन्शन, आला भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट

Insecticide Suit : नवी दिल्ली येथे किसान कवच (Kisan Kavach) या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे (Insecticide Suit) अनावरण केले.

Insecticide Suit : नवी दिल्ली येथे किसान कवच (Kisan Kavach) या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे (Insecticide Suit) अनावरण केले.

शेअर :

Join us
Join usNext

Insecticide Suit : नवी दिल्ली येथे किसान कवच (Kisan Kavach) या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे (Insecticide Suit) अनावरण केले. कीटकनाशकांच्या  हानिकारक परिणामांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले, हे अभिनव संशोधन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. 

अलीकडच्या काळात कीटकनाशक फवारणी (Insecticide spraying)  करतांना शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. या संकटावर मात करण्यासाठी खासगी कंपनीच्या माध्यमातून हा बॉडीसूट विकसित केला आहे. श्वासोच्छवासाचे विकार, दृष्टी जाणे आणि काहीवेळा मृत्यू यासह अनेकदा गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकणाऱ्या कीटकनाशक-प्रेरित विषापासून संरक्षण देण्यास मदत करणार आहे. 
 
“किसान कवच हे केवळ एक उत्पादन नाही, तर आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे दिलेले वचन आहे. कारण ते देशाचे अन्नदाते आहेत,” असे डॉ जितेंद्र सिंह (Jitrendra Singh) म्हणाले. धुता येण्याजोगा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा हा सूट असून त्याची किंमत 4 हजार रुपये आहे. एका वर्षापर्यंत टिकू शकतो आणि संपर्कात आल्यावर हानिकारक कीटकनाशके निष्क्रिय करण्यासाठी प्रगत फॅब्रिक तंत्रज्ञानाचा वापर करतो, ज्यामुळे शेतकरी सुरक्षित राहतील, असेही ते म्हणाले.  

एक महत्वपूर्ण पाऊल 

डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रकल्पाला आकार देण्यात आणि समाजकेंद्रित संशोधन उपलब्ध करून देण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग आणि BRIC-inStem यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना किसान कवच सूटच्या पहिल्या बॅचचे वाटप करण्यात आले, जे भारतातील कृषी क्षेत्रातील 65 टक्के लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उत्पादन वाढले की सूट देखील किफायतशीर किंमतीत उपलब्ध होतील, ज्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध होतील, असेही सांगण्यात येतील. 

 पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...

Web Title: Latest news Agriculture News Now no tension while spraying, India's indigenous insecticide suit has launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.