Join us

Agriculture News : कांदा रोपासाठी मारामार, कांद्याचे बी, रोपांचा भाव काय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 19:41 IST

Agriculture News : शेतकऱ्यांनी रोप तयार करण्यासाठी वाफे तयार केले. मात्र, बदलत्या हवामानाने ही रोपे तयारच झाली नाहीत.

वर्धा : कांद्याचे उत्पादन घटल्याने पुढील काळात कांद्याच्या दरात (Kanda Market) वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात कांद्याची मागणी वाढल्यास कांद्याला चांगला दर मिळेल. त्यातच कांदा रोपांसाठी मारामार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

आता शेतकरी कपाशी काढल्यानंतर कांदा लागवड (Kanda Lagvad) करण्याच्या तयारीत आहेत. यातून शेतकऱ्यांनी कांदा रोपाची (Kanda Rope) पाहणी सुरू केली आहे. मात्र, कांद्याचे रोपण बाजारात उपलब्ध असल्याने कांदा बी फेकून शेतकऱ्यांना लागवड करावी लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. १५ डिसेंबरपर्यंत कांद्याची लागवड करण्यात येते. यानंतरच्या काळात कपाशी काढून अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात. यावर्षी देखील असेच चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा लागवड क्षेत्रही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कांद्याचे बी, रोपांचा भाव काय?कांद्याची लागवड करताना एका एकराला अडीच किलो बी लागते. लाल कांद्याची बी ७०० ते ९०० रुपये किलो आहे, तर पांढऱ्या कांद्याचे बी १००० ते १२०० रुपये किलो आहे. रोपाचे दर त्यापेक्षा जास्त आहेत. एक सरी दोन हजार रुपयांत विकली जाते. एका एकरात १० ते १२ सऱ्यांचे रोप लागतात.

बदलत्या हवामानाचा रोपांना फटका               शेतकऱ्यांनी रोप तयार करण्यासाठी वाफे तयार केले. मात्र, बदलत्या हवामानाने ही रोपे तयारच झाली नाहीत. याचा फटका कांद्याच्या रोपांना बसला. यातूनही कांद्याच्या राेपांचे दर वाढले आहेत. हे दर शेतकऱ्यांच्या हाताबाहेर आहेत.

कांदा उत्पादक काय म्हणतात...कांद्याचा एकूण खर्च मोठा आहे. कांद्याला २५ रुपये किलोच्यावर दर असेल, तरच शेतकऱ्यांना फायद्याचे ठरते. पण, अनेक अडचणींचा सामना करून शेतकऱ्याला नफा पदरी पडत असतो.- सुनील हिवंज, शेतकरी.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकांदाशेतकरी