Join us

Agriculture News: शेतमाला मिळणार बाजारभावाची हमी; काय आहे उपक्रम जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:10 IST

Agriculture News : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष (Agricultural Marketing Cell) सुरू करण्यात आला आहे. जाणून घ्या या उपक्रमाविषयी सविस्तर (Market Price Guarantee)

Agriculture News : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष सुरू करण्यात आला आहे. (Market Price Guarantee)

मध्यस्थांचा अडथळा दूर करत, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करत आणि विक्रीला चालना देण्यासाठी हा उपक्रम सक्रिय झाला आहे. कृषी उत्पन्नाला स्थैर्य देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. (Market Price Guarantee)

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष सुरू करण्यात आला आहे. (Market Price Guarantee)

मध्यस्थांचा अडथळा दूर करत, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करत आणि विक्रीला चालना देण्यासाठी हा उपक्रम सक्रिय झाला आहे. कृषी उत्पन्नाला स्थैर्य देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. (Agricultural Marketing Cell)

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून, कृषी उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' कार्यान्वित करण्यात आले आहे. (Agricultural Marketing Cell)

शेती उत्पादक व खरेदीदार यांच्यात थेट संपर्क साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या कक्षामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (Agricultural Marketing Cell)

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उपाय

सोयाबीन, तूर, गहू, कापूस, चिया, हळद व भाजीपाला यांसारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

'या' आहेत अडचणी

* बाजारपेठेतील अस्थिरता

*  मध्यस्थांचे शोषण

* अपुरी माहिती

* काढणीपश्चात नुकसान

* मूल्यवर्धनाच्या संधींचा अभाव

या अडथळ्यांवर मात करण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 'शेतीशिल्प' उपक्रम सुरू केला आहे.

कशी होणार कामगिरी?

या उपक्रमाअंतर्गत पुढील कार्यवाही होणार आहे

* बाजारपेठ माहिती केंद्राची स्थापना : शेतकरी व खरेदीदारांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी विशेष केंद्र उभारले जात आहे.

* शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी : गुणवत्तेच्या आधारे उत्पादनाची माहिती संकलित करून ती बाजारात पोहोचवण्यावर भर.

* राज्यस्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर विपणन : शेतकऱ्यांचे उत्पादन देशांतर्गत आणि परदेशी बाजारांमध्ये पोहोचवण्याचे प्रयत्न.

* मूल्य साखळीत पारदर्शकता : स्थानिक मूल्यवर्धनाला चालना मिळवून देणे.

शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेचा मार्ग

* या नव्या कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहेत

* थेट खरेदीदारांशी व्यवहार

* उत्पादनाच्या योग्य दराची माहिती

* काढणीपश्चात नुकसान टाळण्यास मदत

* बाजारातील अस्थिरतेवर नियंत्रण

* उत्पन्नात वाढ

शेतीशिल्प हे व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी नव्या संधी उघडणारे ठरणार आहे. स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली नोंदणी करून खरेदीदारांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनविषयक माहिती व सहभागासाठी खालील ई-मेलवर संपर्क साधावा : washimshetishilp@gmail.com

शेतीशिल्प उपक्रमातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मालाचा स्थिर भाव, खुल्या बाजारपेठेतील माहिती आणि थेट व्यवहाराची संधी मिळणार आहे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Chia Pik: जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय?

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनावाशिमबाजार समिती वाशिमबाजारमार्केट यार्ड