Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Biyane Kharedi : शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मागितल्यास....

Biyane Kharedi : शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मागितल्यास....

Latest News Agriculture News Farmers Do not buy seeds at price higher than MRP, | Biyane Kharedi : शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मागितल्यास....

Biyane Kharedi : शेतकऱ्यांनो! बियाणे खरेदी करतांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मागितल्यास....

Biyane Kharedi : शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

Biyane Kharedi : शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

Biyane Kharedi :  नाशिक जिल्ह्यात (Nashik District) खरीप हंगामास नुकतीच सुरवात झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वियाण्याची खरेदी करण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

खरीप हंगामाच्या (Kharif Season) पेरणी सुरु आहे. अनेक शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. अशातच काही ठिकाणी बियाण्यांच्या एमआरपीपेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कि, आपण बियाणे खरेदी करत असतांना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी. त्या बिलाप्रमाणेच रक्कम अदा करावी. सदर बिल पावती जपून ठेवावी. 

जो कोणी बियाणे विक्रेता एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत बियाणे विक्री करीत असेल तसेच पक्के विल देत नसेल त्याची तक्रार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संपर्क साधावा. 

किंवा तक्रार निवारण कक्ष व्हॉट्सअॅप क्रमांक (७८२१०३२४०८) यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व वियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात येते कि, कोणीही बियाणे निर्धारित एमआरपी (कमाल विक्री किंमत) पेक्षा जास्त दरात विक्री करू नये. तसे आढळून आल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

थेट इथे संपर्क करा.
१. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे (मो. ९४२२२२४४५१)
२. मोहीम अधिकारी दिपक सोमवंशी (मो. ९९७५४३४४१८)
३. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी (मो. ९४०३५४६३३८) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Latest News Agriculture News Farmers Do not buy seeds at price higher than MRP,