नाशिक :एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2025-26 अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड आणि आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी , लिंबु, पेरू व आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे, तसेच आळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे याबाबींचा समावेश होतो.
योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलhttps://mahadbt.maharashtra.gov.in वर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनदरम्यान योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधाचा वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी बाबीमुळे फळबागांची उत्पादकता कमी होते. त्यामुळे जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक ठरते. म्हणजे जुन्या आणि उत्पादनक्षमता कमी झालेल्या फळबागांची उत्पादकता वाढवणे. यासाठी छाटणी, योग्य खत व्यवस्थापन, किडी आणि रोगांवर नियंत्रण, तसेच पाणी व्यवस्थापनासारख्या उपाययोजना केल्या जातात.
ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
- सातबारा, आठ अ
- आधार कार्डाची छायांकित प्रत
- आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
- जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- यापूर्वी कोणत्याही योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
- पासपोर्ट फोटो
योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.