Join us

Agriculture News : फलोत्पादन घटणार, कांदा, टोमॅटोचे उत्पादन कसे असेल? तिसरा आगाऊ अंदाज जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 16:14 IST

Agriculture News : विविध बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादन याविषयीचा 2023-24 चे तिसरे आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे.

Agriculture News : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (Agriculture Department) राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्रफळ आणि उत्पादन याविषयीचा 2023-24 चे तिसरे आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे. 

 2023-24 ची वैशिष्ट्ये (तिसरे आगाऊ अंदाज) 

2023-24 मध्ये देशातील फलोत्पादन अंदाजे 353.19 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे, 2022-23 च्या (अंतिम अंदाजांच्या) तुलनेत हे उत्पादन सुमारे 22.94 लाख टनाने (0.65%) कमी असेल.

एकूण बागायती क्षेत्रफळ

2022-23

2023-24 (दुसरे आगाऊ अंदाज)

2023-24 (तिसरे आगाऊ अंदाज)

क्षेत्रफळ (दशलक्ष हेक्टरमध्ये)

28.44

28.63

28.98

उत्पादन (दशलक्ष टनांमध्ये)

355.48

352.23

353.19

 

फळे, मध, फुले, लागवडीची पिके, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात 2023-24च्या (अंतिम अंदाजात) वाढ दिसून आली आहे. मुख्यत्वे आंबा, केळी,लिंबू, द्राक्षे, सीताफळ आणि इतर फळांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे, 2023-24 मध्ये फळांचे उत्पादन 2022-23 च्या तुलनेत 2.29% वाढून 112.73 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सफरचंद, मोसंबी, मंडरिन, पेरू, लिची, डाळिंब, अननस यांचे उत्पादन 2022-23 च्या तुलनेत कमी होण्याची अपेक्षा आहे.

भाजीपाला उत्पादन सुमारे 205.80 दशलक्ष टन होण्याचे मानले जात आहे. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, साबुदाणे, दुधी भोपळा, भोपळा, गाजर, काकडी, कारली, पडवळ आणि भेंडीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे, तर बटाटा, कांदा, वांगी, सुरण, सिमला मिरची आणि इतर भाज्यांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे.

कांदा, टोमॅटोचे अपेक्षित उत्पादन 

2023-24 मध्ये कांद्याचे उत्पादन 242.44 लाख टन (तिसरा आगाऊ अंदाज) अपेक्षित आहे. 2023-24 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 213.20 लाख टन (तिसरा आगाऊ अंदाज) अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या सुमारे 204.25 लाख टनच्या तुलनेत, उत्पादनात 4.38 ने वाढ झाली आहे. तर 2023-24 मध्ये देशात बटाट्याचे उत्पादन सुमारे 570.49 लाख टन अपेक्षित आहे (तिसरा आगाऊ अंदाज) जे मुख्यत्वे बिहार आणि पश्चिम बंगालमधील उत्पादनात घट झाल्यामुळे आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनाकांदाटोमॅटो