Join us

Agriculture News : पीक कापणी प्रयोगातील मजुरी वाढविली, कसा असेल यंदाचा मजुरी दर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 14:58 IST

Agriculture News : पीक सर्वेक्षण योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिक कापणी प्रयोगांसाठी देण्यात येणाऱ्या मजुरीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

Agriculture News : राज्यात पीक सर्वेक्षण योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगांसाठी (Crop Harvesting) देण्यात येणाऱ्या - मजुरीचे दर दि.१.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहेत. पीक कापणी प्रयोगांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मजुरी दरानुसार मजुर उपलब्ध होत नसल्याने, मजुरीच्या दरात वाढ करुन सदरचा मजूरी दर रोजगार हमी योजनेच्या प्रतिदिन मजुरी दराशी सुसंगत म्हणजेच रु.२९७ प्रति पीक कापणी प्रयोग याप्रमाणे विहित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. 

राज्यात पीक सर्वेक्षण योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिक कापणी प्रयोगांसाठी देण्यात येणाऱ्या मजुरीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तथापि, मजुरीच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने पीक कापणी प्रयोगांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मजुरीच्या दरामध्ये मजुर उपलब्ध होत नाहीत. केंद्र शासन प्रत्येक वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत द्यावयाच्या मजुरीचे दर निश्चित करते. केंद्र शासनाने निश्चित केलेला मजुरीचा दर राज्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मजुरांना लागू होतो. 

केंद्र शासनाने मजुरीचा दर दि.१.४.२०२४ पासून रु. २९७/- इतका निश्चित केलेला असून राज्य शासनाने सदर मजुरीचा दर राज्यात लागू केलेला आहे. पीक कापणी प्रयोगासाठी सदर दराने मजूरी देण्याचा प्रस्ताव संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र. (५) च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिक कापणी प्रयोगांमध्ये अचूकता असणे आवश्यक असल्यामुळे कृषि आयुक्तालयाने प्रस्तावित केल्यानुसार नियोजन विभागाच्या पत्रास अनुसरुन आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पत्रानुसार विहित करण्यात आलेला श्रमिक सेवा मजुरीचा दर पीक कापणी प्रयोगांसाठी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

दर वाढविण्यास मंजुरी 

त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिक कापणी प्रयोगांमध्ये अचूकता असणे आवश्यक असल्यामुळे आणि पीक कापणी प्रयोगांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मजुरी दरानुसार मजुर उपलब्ध होत नसल्याने, मजुरीच्या दरात वाढ करुन सदरचा मजूरी दर रोजगार हमी योजनेच्या प्रतिदिन मजुरी दराशी सुसंगत म्हणजेच रु.२९७/- प्रति पीक कापणी प्रयोग याप्रमाणे विहित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. 

टॅग्स :पीक व्यवस्थापनकाढणीमार्केट यार्डशेती क्षेत्र