Join us

Agriculture News : अवकाळीने झोडपले, कष्टातून बाग फुलवली, आता थेट बांधावरून केळीची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:17 IST

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी ठोक विक्रेते मिळवून दिले. हे विक्रेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कच्च्या केळीची खरेदी केली.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (पोडे) येथील सहा शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड (Banana Cultivation) केली होती. अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने नुकसान झाले. पीक विम्याची (Pik Vima) रक्कम मिळाली नव्हती. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी पाहणी करून शासनाला अहवाल दिला. शेतकऱ्यांसाठी ठोक विक्रेते मिळवून दिले. हे विक्रेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कच्च्या केळीची खरेदी केली.

कृषी विभागाने केळी लागवडीसाठी (Keli Lagvad) नांदगाव (पोडे) येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. मात्र, अवकाळी पावसाने नुकसान झाले. पिकांची भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागाने ठोक विक्रेते मिळवून दिले. त्यामुळे केळीला १२ हजार रुपये टन भाव मिळाला. 

दरम्यान स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने महिला बचतगटाद्वारे केळीवर प्रक्रिया करून चिप्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पिकाला योग्य मोबदला व बाजारपेठ उपलब्ध झाला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मनरेगाअंतर्गत केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनीही पारंपरिक पिकांसोबत योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊन उत्पन्नात वाढ करावी.- श्रीधर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बल्लारपूर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनमार्केट यार्ड