Agriculture News : भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातील ४० गावांमध्ये कृषी जैवविविधता उपक्रम हा नवा प्रयोग राबविला जात आहे. प्रायोगिक तत्वावरील या प्रयोगाचे यश पुढील तीन वर्षानंतर दिसणार आहे.
आजच्या काळात शेती खर्चाची झाली ओरड असल्याची सातत्याने कानावर येत असते. हे खोटे नाही. रासायनिक खते, बियाणांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जगण्यासाठी शेती करायची तर, उत्पन्न तर मिळायला हवे. अशा वेळी जमिनीच्या पोताचा आणि जैवविविधतेचा विचार न करता सारेच रासायनिक शेतीकडे वळले.
परिणाम व्हायचा तोच झाला. हळूहळू जैवविविधता नष्ट होऊ लागलीय. हे असेच चालत राहीले, तर एक दिवस शेतीवर संकट आल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे शेतीच्या तंत्रात नवी दिशा देण्यासाठी आता कृषी जैवविविधता व नैसर्गिक शेती हा उपक्रम विदर्भातील काही जिल्ह्यात सुरू झाला आहे.
असा आहे हा प्रयोग
तुमसर तालुक्यामधील चिखली गावात योगेश पेंदाम यांनी अर्धा एकर क्षेत्रामध्ये विविध पिकाची संरचना त्यांनी केली आहे. एकदल-मका-सहा बेड, भेंडी-दोन बेड, दोडका-दोन बेड, काकडी-एक बेड, फूलगोभी-दोन बेड, मिरची-चार बेड, वांगे-दोन बेड, आडव्या लाईनला कुंपणाच्या साईटला सुरण व अडक लागवड, अद्रक-एक बेड, कांदा-मिक्स, लाल माठ-मिक्स, अळू-एक बेड, तूर-दोन बेड, कारले-एक बेड, सुरण व फूलगोभी-दोन बेड असे १६ पिके लागवड झाली आहे.
कुठे आहे हा उपक्रमभंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि साकोली तालुका, चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा आणि मूल, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी आणि गडचिरोली तसेच सोलापूर तालुक्यातील सांगोला या सर्व तालुक्यातील प्रत्येकी १० गावांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या प्रत्येक गावातील चात ते ५ शेतकऱ्यांच्या शेतावर सुरू असलेला हा प्रयोग नवी दिशा साकारत आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून मिळतेय दिशाया अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावरील किमान अर्धा एकराच्या प्लॉटमध्ये हा प्रयोग साकारला जात आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. रासायनिक खते, औषधांचा आणि बियाणांचा वापर न करता केवळ जैवविविधतेवर यात भर दिला जातो. शेतीच्या एकूण खर्चातून ४० टक्के खर्च कपात यातून केली जात आहे.
Jamin Kharedi : तुमच्याकडे जमीन नाही पण नोंद सापडली तर जमीन नावावर होऊ शकते का?