Join us

Agricultural News : शेतकऱ्यांनो! उत्पादन वाढवायचंय? मग 'हे' अभियान तुमच्यासाठीच आहे!" वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:15 IST

Agricultural News : २९ मेपासून सुरू होणाऱ्या या देशव्यापी अभियानात, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून वैज्ञानिक सल्ला, नवकल्पना आणि संशोधनाचे फायदे शेतीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचे लक्ष्य ठरवले गेले असून, भारताच्या कृषी विकासात हे अभियान एक मैलाचा दगड ठरणार आहे. जाणून घ्या सविस्तर (Farmers)

 Agricultural News : शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. 'विकसित कृषी संकल्प अभियान' या देशव्यापी उपक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  (Farmers)

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Union Minister for Agriculture and Farmers Welfare Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान २९ मेपासून औपचारिकपणे सुरू होणार आहे. 

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीविषयक संशोधन, नवकल्पना आणि मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे. (Farmers)

शेतकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारे नेतृत्व

NASC कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे देशभरातील कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधताना चौहान यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारे असल्याचे सांगितले.

पुढे त्यांनी असे सांगितले की, शेती माझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि शेतकरी माझ्या प्रत्येक कणात वास करतो. त्यांनी उत्पादन वाढ, खर्च घट, अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने या अभियानाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. हे अभियान परिणाम आधारित असून त्याचे परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Farmers)

संशोधन आणि संवादाचा सेतू

चौहान यांनी पुढे असे सांगितले की, या अभियानाद्वारे ICAR, कृषी मंत्रालय, राज्य सरकारे, कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) आणि शेतकरी एकत्रितपणे संवाद साधतील. देशभरातील ७०० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविले जाणार असून, १.५ कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट आहे.

शेती ही केवळ व्यवसाय नाही, ती भावनेने जोडलेली आहे. विज्ञान आणि भावना यांचा समन्वय या अभियानाद्वारे साधला जाणार आहे.

संशोधनाला नवा दृष्टिकोन

ICAR महासंचालक डॉ. एम. एल. जात यांनी सांगितले की, हे अभियान मागणी आधारित संशोधनावर भर देईल. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मागणीविना संशोधनाचा काळ संपला असून, आता गरजेनुसार संशोधन करून त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची संशोधन क्षमता जागतिक दर्जाची

चौहान यांनी कृषी वैज्ञानिकांचा उत्साह वाढवत सांगितले की, भारतातील कृषी संस्था आणि वैज्ञानिकांची क्षमता जगभरात कौतुकास्पद आहे. संशोधनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमात कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी, ICAR चे महासंचालक डॉ. एम. एल. जात, विविध कृषी संस्था आणि कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी, ७३१ KVKs चे शास्त्रज्ञ, ११३ ICAR संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रयोगशील शेतकरी सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या समारोपात डॉ. राजेंद्र प्रसाद, संचालक, ICAR-भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था यांनी आभार मानले.

'विकसित कृषी संकल्प अभियान' हे भारतातील कृषी क्षेत्रात एक नवे पर्व उलगडणारे पाऊल ठरणार आहे. शेतीची उन्नती आणि शेतकऱ्यांचा विकास या अभियानाच्या केंद्रस्थानी असून, हे अभियान वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा पूल अधिक मजबूत केला जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Mahabeej Cotton Seeds: शेतीतील नवा विश्वास: कापसाचे नवे वाण शेतकऱ्यांच्या सेवेत जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकेंद्र सरकारसरकारी योजनाकृषी योजना